कानिफनाथ गडावरील भगवा ध्वज काढून फेकला
खर्डा येथे निषेध; कारवाईची शिवप्रतिष्ठानची मागणी
जामखेड प्रतिनिधी ,
खर्डा व जामखेड तालुक्यातील शिवप्रेमी हिंदू बांधवांच्या वतीने खर्डा पोलीस स्टेशनला घटनेचा निषेध व्यक्त भगवा ध्वज अज्ञाताने काढून फेकून दिला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या खर्डा व जामखेड येथील नागरिकांनी घटनेचा निषेध व्यक्त करून खर्डा पोलीस स्टेशनला संबधित समाजकंटकावर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले.
खर्डा येथील श्री कानिफनाथ गडावर सोमवती अमावस्या निमित्ताने गडावर महाआरती तसेच महाप्रसाद करण्यात आला होता तसेच गडावर भगवा ध्वज ही लावण्यात आला होता. मात्र दि १ जानेवारी २०२५ रोजी अज्ञात समाजकंटकाने लावलेला भगवा ध्वज काढून फेकून दिल्याचे निदर्शनास आले. दि २जानेवारी रोजी तहसील कार्यालय जामखेड तसेच खर्डा पोलिस स्टेशन येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या जातीय तेढ निर्माण करणारांचा शोध घेऊन कारवाई
करण्यात यावी जेणे करुन समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी मागणी खर्डा व जामखेड तालुक्यातील शिवप्रेमींनी खर्डा पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, अरविंद ठाकरे, योगेश सुरवसे, सुजित पवार, पारस सुरवसे ,सुदेश दहिदोंडे, रोहन चावणे, अजय सुरवसे, संकेत सातपुते, विजय शिंदे, रुद्र हुंबे ,ओंकार इंगळे ,गणेश ढगे, आकाश खेडकर, बाबू गटकळ उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
कानिफनाथ गडावरील भगवा ध्वज काढून फेकला खर्डा येथे निषेध; कारवाईची शिवप्रतिष्ठानची मागणी
RELATED ARTICLES