Homeव्हिडिओ बातम्याकळच झाला! अल्पवयीन मुलीवर बळजबरीने वेळोवेळी आत्याचार.. मुलगी गर्भवती ; दोघांवर गून्हे...

कळच झाला! अल्पवयीन मुलीवर बळजबरीने वेळोवेळी आत्याचार.. मुलगी गर्भवती ; दोघांवर गून्हे – आरोपी अटक

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मौजे नायगाव येथील अल्पवयीन मुलीवर बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिले प्रकरणी
नायगाव येथील आरोपी राजेश बबन उगले , बाळासाहेब काशिनाथ लेंडे दोघे रा.नायगाव तालुका जामखेड यांच्या विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला बाल लैंगिक अपराध पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ प्रमाणे तसेच भा.द.वी.कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी राजेश बबन उगले यास अटक करण्यात आली असून त्यास १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.तसेच दुसरा आरोपी बाळासाहेब काशीनाथ लेंडे यालाही दिनांक ९ जून रोजी अटक केली आहे.पिडीतेच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीची अल्पवयीन मुलगी (वय १४ वर्ष ९ महिने) जुन २०२३ मध्ये (तारीख आठवत नाही) सायंकाळी४ ३० वा. शाळा सुटलेनंतर एकटीच पायी चालत घरी जात असतांना आरोपीने त्याचे राहते घरासमोर रस्त्यामध्ये अडवून तु माझे सोबत आमचे घरी चल नाहीतर तुला जिवच मारून टाकील तुझे शाळेत येणे जाणे बंद करून टाकील अशी धमकी देवून त्याचे घरामध्ये बोलावून घेवून बळजबरीने मिठी मारून तिचे अंगातील कपडे काढून तिची इच्छा नसताना शारीरीक संबंध केले आहेत.

त्यानंतर तु कोणालाकाही सांगीतले तर तुला जिवच मारून टाकीन अशीही धमकी दिली. त्यानंतर आरोपीने वेळोवेळी पिडीत मुलगीला शाळेतुन घरी जात असताना तिला धमकी देवून आत्याचार केला आहे. त्यानंतर २८/०३/२०२४ रोजी इयत्ता ९ वी ची वार्षीक परिक्षेचे 15 दिवस अगोदर पिडीत मुलगीस अशीच धमकी देवून बळजबरीने शारीरीक संबंध करून तिला गर्भवती केले वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून आरोपी राजेश बबन उगले नायगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———————
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास करत असताना यातील पिडीत मुलीने तिच्या जबाबात सांगीतले की, तिचे राहते घरामध्ये एकटीच असातना त्यांचे गावातील आरोपी क्र २ बाळासाहेब काशिनाथ लेंडे याने पिडीतेच्या घरी पाणी पिण्याचे बहाना करुन जावुन पिडीताला धमकी दिली. त्यानंतर दोन ते तीन वेळा पिडीत मुलीचे घरामध्ये जावुन बळजबरी करुन शारीरीक संबंध करुन तीला जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच दिनांक २६/०१/२०२४ रोजी पिडीत मुलगी ही आरोपी क्र 2 बाळासाहेब लेंडे त्याचे शेतामध्ये ज्वारीचे कनसे काटत असताना त्याने त्याच्या स्वतःच्या मुलगी दुपारी घरी पाठवुन दिले त्यानंतर आरोपीने पिडित मुलीस शेतातील ज्वारीमध्ये बळजबरी शारीरीक संबंध केले आहेत. असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड,यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ संभाजी शेंडे, पोकाँ शशी म्हस्के, पोकाँ बाळु खाडे, पोकाँ अशोक बडे यांच्या पथकाने आरोपीचा तात्काळ शोध घेवुन त्याला मोठ्या शिताफीने अटक केली.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शानाखाली पोहेकाँ संभाजी शेंडे,पोकाँ शशिकांत म्हस्के,पोकॉ.बाळू खाडे,पोकॉ. अशोक बडे करत आहेत.

सदर पिडीत मुलगी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल आहे. 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!