जामखेड/कर्जत प्रतिनिधी
एमआयडीसी कर्जत तालुक्यातच होत आहे ती इतर तालुक्यामध्ये गेली नाही किंवा रद्द ही झाली नाही त्याचा फायदा कर्जत शहरासह तालुक्यात होणारच आहे. एमआयडीसी मान्यतेचा आनंद तालुक्यातील सर्व जनतेला व तरुणांना झालाच आहे मग कर्जत बंद कोणाच्या फायद्यासाठी आहे असा प्रश्न भाजपाचे अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी बंद आयोजकांना केला आहे.
.कर्जत बंदबाबत
चारच व्यापारी अचानक ठरवून राजकीय हेतूने सोशल मीडियावर कर्जत बंद ची पोस्ट टाकतात त्यावर इतर व्यापाऱ्यांची मते ,मतांतरे न होण्याआधीच त्या ग्रुप लाही लॉक करतात व इतर सर्व ग्रुपवर पोस्ट व्हायरल करतात मग सर्वसामान्य छोटे मोठे व्यापारी, शेतकरी ,हॉटेल व्यावसायिक, कामगार, विविध कामासाठी तालुक्यात आलेल्या जनतेची ससेहोलपट होते.
#MIDC कर्जत तालुक्यातच होत आहे ती इतर तालुक्यामध्ये गेली नाही किंवा रद्द ही झाली नाही त्यामुळे कर्जत शहराला ही याचा फायदा होणारच आहे त्यामुळे मान्यतेचा आनंद तालुक्यातील सर्व जनतेला व तरुणांना झालाच आहे परंतु महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या निर्देशानुसार या जागेला भुनिवड समितीने गुगल मॅप तसेच सॅटेलाईटच्या माध्यमातून रीतसर नियमाने स्थळ पाहणी अहवाल तयार करूनच या जागेची निवड केली आहे.
#निरव_मोदी , बारामती ,पुण्याचे मोठे व्यापारी , उधोगपती व लोकप्रतिनिधी च्या निकटवर्तीय यांनी खरेदी केलेल्या जागेत ठरवून झालेल्या #MIDC मध्ये ना शेतकऱ्यांचा फायदा ना येथील सुशिक्षित बेरोजगारांचा फायदा झाला असता.कर्जत बंद आता कोणाला तरी बाहेरच्या भ्रष्टाचारामुळे E_D ची नोटीस आली, कुठला तरी कारखाना जप्त झाला , कुणावर तरी कारवाई झाली तरी त्याचे पडसाद आपल्या सर्वसामान्य व्यापारी ,जनतेवर होतोय.बंद ला हरकत नाही परंतु तसे कारण हवे राजकारण नको. त्यामुळे सर्वसमावेशक व्यापारी एकत्र येऊन या बंद वर चर्चा झालीच पाहिजे.
तालुक्याची प्रगती होत असताना प्रत्येक विकास घटकांचा फायदा व्यापारी ,सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचतच असतो.″
पुराणकाळात देव दानवांच्या युद्धात समुद्रमंथन होऊन ज्या प्रमाणे अमृत बाहेर पडले त्या प्रमाणेच तालुक्यातील अनेक विकासकामांच्या प्रश्नांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची अशी वेगवेगळे मत ,मतांतरे च्या माध्यमातून मंथन होऊन विकासकामांची गंगा जनतेपर्यंत नक्कीच पोहचेल.
कारण.एकीकडे भुलभुलैय्या ,नौटंकी अपरिपक्व बालिश परंतु मायावी_शक्ती आणि एकीकडे जनतेची नाळ ओळखणारा आणि विकासाचा समतोल राखून दूरदृष्टी ने विकास करणारा भूमिपुत्र आहे.असे
भाजपाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी सांगितले. कर्जत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.