उन्हाच्या झळा वाढल्या ; पाणी टंचाई जाणवू लागली
पाणी टँकर मागणीत वाढ
मुंगेवाडी ग्रामस्थांचे उपोषणाचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
सध्या दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. जामखेड तालुक्यातील बहुतांश गावात पाणी जाणवु लागली आहे. मुंगेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाने ७ दिवसाच्या आत पाण्याचे टँकर सुरू करावेत अन्यथा ग्रामस्थांसहित उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच सुग्रीव भोसले यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत लोखंडे, मदन पाटील बाप्पा सुरवसे, लक्ष्मण शिंदे हे उपस्थित होते.
मुंगेवाडी हे गाव खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येत असून हा भाग डोंगरी आहे. मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे येथील साठवण तलावात पाणी शिल्लक नसल्याने गावातील लोकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरपणे उभा ठाकला आहे. नागरिकांना एक ते दोन किलोमीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या संदर्भात महिलांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, सध्याचा पिण्याच्या पाण्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने योग्य ती कारवाई करून सात दिवसाच्या आत पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करावेत अन्यथा मुंगेवाडी ग्रामस्थां सहित उपोषण करण्याचा इशारा भोसले यांनी दिला आहे.