उद्योगपती दिलिप बाफना यांच्या घरी विधानपरिषद सभापती ना प्रा राम शिंदे यांची सदिच्छा भेट
बाफना परिवाराने केला सन्मान
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील उद्योगपती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाफना यांच्या निवासस्थानी दि २८ जानेवारी रोजी विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा राम शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी युवा उद्योजक आकाश दिलीप बाफना व बाफना परिवाराच्या वतीने नामदार प्राध्यापक राम शिंदे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे , उपाध्यक्ष महावीर बाफना, सेक्रेटरी शरद शिंगवी, भाजपा व्यापारी शहराध्यक्ष पिंटू बोरा, गोरोबा बँकेचे चेअरमन विनायक राऊत, गौतम दादा बाफना, अभय बाफना, अनिल बाफना, मिथून बाफना,नगरसेवक दिगंबर चव्हाण,अशोक बाफना,रोशन बाफना,उमेश नगरे,अवधूत पवार,लहु शिंदे, शिवकुमार डोंगरे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215