जामखेड प्रतिनिधी
राम शिंदेंना विकासाबाबत कळतच नाही, कामावर राम शिंदे हे बोलत नाही ते व्यक्तिगत टिका करतात त्यांना माझे आव्हान आहे की त्यांच्यात अगर हिंमत असेल तर त्यांनी विकाराच्या मुद्यावर समोरासमोर पावे मी पुरावे घेऊन येतो त्यांनी त्यांचे घेऊन यावे असे आवाहन आ. रोहित पवार
यांनी आ.राम शिंदे यांना दिले.
आ. रोहित पवार यांनी कर्जत येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी चौडी येथील अहिल्यादेवी होळकर,खर्डा येथील सिताराम बाबा गड, गिते बाबा , जामखेड येथील श्री नागेश्वर मंदिर, इमामशाह वली दर्गा,
कर्जत येथील गोदड महाराज
पांचे कुटूंबासह दर्शन घेतले.
यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी आ रोहित पवार यांचे औक्षण केले.
कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी
अर्ज दाखल यावेळी
प्रामुख्याने आहिल्यादेवी होळकर घराण्याचे वंशज बृजभूषण
होळकर , सुनंदाताई पवार मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यानंतर कर्जत येथील आकाबाई चौकातुन भव्य रॅली काढण्यात आली. रँलीनंतर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आ.पवार म्हणाले की , महाविकास आघाडीचे १७० ते १८० उमेदवार निवडून येतील, महाराष्ट्रात बरयाच ठिकाणी काही अपक्ष उमेपवार उभे आहेत ते मते खाण्यासाठी आहेत.काही अपक्ष आहेत त्यांना सुपारीबाज महटले जात आहे.लोक महाविकाल आघाडीच्या विचाराला
पाठिंबा देतील व मतदान करतील
सुपारीबाजांना मतदान करणार नाही,
मराठा संघर्ष योध्दा मनोज
जरांगे पाटील यांच्या उमेदवाराचा
अर्ज दाखल केला आहे. ३०
तारखेला जरांगे पाटील भूमिका स्पष्ट
करणार आहे. त्यावेळी कोणाचा
कोणाला पाठिंबा आहे हे कळेल असे
आ. रोहित पवार म्हणाले,
आ. रोहित पवारांचे नृत्य व रॅलीतून शक्तिप्रदर्शन
* रॅलीत आ. रोहित पवारांचा यांच्या रॅलीत धनगरी नृत्य सादर करण्यात आले यावेळी आ. रोहित पवार यांनी तशी वेशभूषा करून नृत्य केले. या रॅली सर्व जातीधर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थिताकडून “एकच वादा रोहित दादा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होते. सदर रॅलीतून शक्तीप्रदर्शन पाहता रोहित पवारांचे विजयाचे मताधिक्य नक्कीच
वाढणार अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत होती.
आ. रोहित पवारांचा भुमीपूत्रावर टोला
* देशातील तुम्ही, मी असे १४० कोटी लोक भुमीपूत्र आहे. जर कोणी देश, राज्य,प्रांत प्रभाग यावर भेदभाव करत असेल तर ते चुकीचे आहे. माझ्या विरोधात असणारे येथील उमेदवार जर भुमीपूत्रावर बोलत असतील तर ते माझ्यावर बोलत नाही ते त्यांच्या पार्टीच्या विरोधात बोलत आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे तेथील नाहीत तरी ते दुसरीकडे उभे आहेत.
राम शिंदे यांना पार्टीकडून अजून मदत मिळाली नाही ज्यावेळेस मदत मिळेल
त्यावेळी ते प्रचाराला लागतील.
जातीपातीचे राजकारण भाजपकडून होईल
* जातीपातीचे राजकारण करण्यासाठी भाजपकडून दोन रामाजात तेढ
निर्माण करण्यात प्रयत्न होत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे.
तुम्ही किती काही प्रयत्न केला तर विकासावर लोक मतदान करतील.
गेल्या दहा वर्षाचा विचार केला तर भाजप सरकारने महाराष्ट्राचा कमी
गुजरातचा जास्त विचार केला त्यामुळे भाजप नेत्याच्या डोळ्यावर
गुजरातची पट्टी आहे. ती पड्डी काढायची वेळ आली आहे. ख-या अर्थाने महाराष्ट्र एक नंबर राज्य करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत.