जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सवास आ. रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने ३ लाख १ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त दि.१२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य सार्वजनिक जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने आ. रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने नुकतीच सार्वजनिक शिवजयंती महोत्सवासाठी
३ लाख १ हजार रुपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली.
यावेळी डॉ प्रशांत गायकवाड, डॉ भरत देवकर, अवधुत पवार, दत्तात्रय सोले पाटील, महेश यादव यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस प्रा .राजेंद्र पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, युवक शहराध्यक्ष वसीम सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथ्था व सुरेश पवार, गणेश डोके ,लक्ष्मण ढेपे हे उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215