जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड मतदारसंघात
भुमिपुत्र विरूद्ध राजपुत्र अशी निवडणूक आहे.आता सगळे भुमिपुत्राच्या पाठीमागे राहून बारामतीचे राजपुत्र परत पाठवा. आ प्रा.राम शिंदे यांना पून्हा मंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मिळणार आहे यासाठी जामखेड कर्जत तालुक्यातील जनतेने राम शिंदे सारख्या प्रमाणिक भुमिपुत्राला मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य नितीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी केले. भाजपाचे उमेदवार आ प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ पाशाभाई पटेल तसेच आर्थिक विकास महामंडळाचे आ नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळीप्रा सचिन गायवळ प्रा मधुकर राळेभात
डॉ भगवान मुरुमकर, अँड कैलास शेवाळे, अजय काशीद, नजीरभाई सय्यद, अमित चिंतामणी, शामीरभाई सय्यद, अमित जाधव, रवि सुरवसे, शरद कारले, महेश निमोणकर, सलिमभाई बागवान, सुनिल साळवे, सलिमभाई तांबोळी, अँड बंकटराव बारवकर, काकासाहेब गर्जे, कांतीलाल वराट, यांच्यासह भाजपामित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिक व विशेष करून यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना आर्थिक विकास महामंडळाचे आ नितीन पाटील म्हणाले की जमीन बळकावणे समाजात वाद निर्माण करणे हे काम करणार्यांना परत पाठवले जातील. आ प्रा.राम शिंदे माणुस म्हणुन चांगले आहेत. मंत्री म्हणून चांगले काम केले आहे. पुन्हा मंत्री म्हणून काम करणार आहेत. त्यांनी मागील वेळी पराभव झाला म्हणून खचुन न जाता आपले काम प्रामाणिकपणे केले. म्हणून विधानपरिषद मिळाली तसेच आता तुम्ही जनतेने निवडून दिले तर पुन्हा मंत्रीपद मिळणार आहे.
शरद पवार जेष्ठ चाणक्य आता रिटायर होत असुन तरुण चाणक्य देवेंद्र फडणवीस आता रिंगणात आहेत. जे मंत्री मुख्यमंत्री असतांना पवार यांनी केले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप संविधाला हात लावणार नव्हते मात्र विरोधकांनी जनतेच्या मनात कायम संभ्रम निर्माण केला असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रा मधुकर राळेभात, प्रा सचिन गायवळ,डॉ भगवान मुरुमकर, पै शरद कारले, नगरसेवक अमित चिंतामणी, शामीरभाई सय्यद, पवन राळेभात, अमित जाधव, सुनिल साळवे, नजीरभाई सय्यद, आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना आ प्रा राम शिंदे यांनाच मताधिक्याने निवडून देण्याने आवाहन केले.