जामखेड प्रतिनिधी
कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मोठ – मोठ्या शहरांमध्ये अशा करिअर गाईडन्सचे आयोजन केले जाते. तेथे करिअर मंत्र बाबत कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्सची माहिती मिळत नाही.तिथपर्यत त्यांना पोहचण्यास अडचणी येतात. याच बाबींचा विचार करून आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे जामखेड तालुका अनुराग संयोजक अनूराग गुगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत जामखेड मधील विद्यार्थ्यांसाठी “करिअर मंत्र – द करिअर गाईडन्स” कार्यक्रमाचे आयोजन दि १३ एप्रिल रोजी लना होशिंग विद्यालयात आयोजित केले आहे.
याठिकाणी प्रोफेसर गिरिश कूकरेजा यांचे करिअर बाबत मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. सर्व वयोगटातील विद्यार्थी व नागरिक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी फी नाममात्र २० रूपये शुल्क ठेवले आहे. यासाठी अनूराग गुगळे (फोन नंबर 9404780638) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी जामखेड मधील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी या करिअर मंत्र – द करिअर गाईडन्स कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामखेड तालुका संयोजक अनूराग गुगळे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी एच.यु गुगळे पतसंस्था, मोहन शंकर ढाळे सराफ आणि ज्वेलर्स, सुभेदार वाँच सेटर यांचे सहकार्य आहे.
प्रतिनिधीयासीन शेख9423391215