Homeव्हिडिओ बातम्याआई-बहिणीवर शिव्या दिल्या तर ५०० रूपये दंड सर्वच ग्रामपंचायतींनी महिला...

आई-बहिणीवर शिव्या दिल्या तर ५०० रूपये दंड सर्वच ग्रामपंचायतींनी महिला सन्मानार्थ निर्णय घेण्याची गरज ; असा सौंदाळा ग्रामपंचायतचा ठराव

जामखेड प्रतिनिधी

समाजात महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे पुरूषच आई बहिणीवर शिव्या देऊन महिलांचा अपमान करतांना दिसतात. ही दूर्दैवी बाब आहे.

छोटे छोटे भांडणं झाले तरी
शिकलेले व निरक्षर दोन्ही प्रकारचे लोक एकमेकांना शिव्या देतात.शिव्यांमध्ये आई बहिणींचा मोठ्या त्वेषाने उल्लेख करतात. मात्र आता आई बहिणीवर शिव्या देणाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा कौतुकास्पद निर्णय अहिल्यानगर जिल्ह्य़ातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतमध्ये ठरावाद्वारे घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना सरपंच शरद अरगडे यांनी सांगितले की, शिव्या देताना आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयवा संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्रीचा अपमान केला जातो. शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई-बहिणींना, मुलींना आठवले पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आई बहिणींचा अपमानजनक उल्लेख करत शिव्या देण्यासाठी बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या निर्णयासह अनेक जनहीताचे ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सरपंच अरगडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर पाचशे रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी सौंदाळा ग्रामपंचायतचे सरपंच शरद अरगडे,उपसरपंच कोमल अरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आढागळे, कावेरी आढागळे, ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांच्यासह मोठया संख्येने महिलांसह पुरुष हजर होतेघेण्यात आला आहे.
राज्यातील एकमेव सौदाळा ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतचा आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतींनीही स्त्री सन्मान व समाजहिताचा निर्णय घेण्याची गरज आहे .

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!