- जामखेड प्रतिनिधी
.जामखेड तालुक्यातील तरडगाव येथील प्रगतशील शेतकरी तथा सेवानिवृत्त शिक्षक विष्णूपंत यांच्या पत्नी व मुलगा वसंत यांच्या मातोश्रीचे वर्षेभरापूर्वी निधन झाले ; त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या पिता – पुत्राने लावले १०११ फळझाडं ; त्याच फळझाडांची प्रथम स्मृतीदिनी सानप कुटुंबातील सदस्यांनी पुजा केली ; पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला ; यावेळी महंत विकास महाराज वायसे, गायत्री मंदीराचे महंत महादेव महाराज सानप ; आमदार रोहित पवार यांच्या सौभाग्यवती कुंतीताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविताई विजयसिंह गोलेकर , कृषीभूषण रविंद्र कडलग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महादेव डूचे, केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी सचीन भंडारी आदिंसह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थितीत होते.
वर्षभरापूर्वी विष्णूपंत सानप यांच्या पत्नी वसंत यांच्या मातोश्री शहाबाई यांच श्वसनाच्या आजाराने निधन झाले ; तब्बल दोन वर्षे त्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणात झाला ; शेवटचे ४५ दिवस त्यांना व्हेंटीलेटरवर काढावे लागले. निधनानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांनी लावलेल्या आंब्याच्या शेतात केला आणि रक्षा विसर्जित न करता ; शेतात खड्डे घेऊन विसर्जन केले ; एवढ्यावर न थांबता त्याठिकाणी विष्णूपंत व वसंत या पिता पूत्राच्या यांच्या संकल्पनेतून रक्षा विसर्जित केलेल्या ठिकाणी नवीन फळझाडांची लागवड करण्याचा संकल्प सोडला. याकरिता तब्बल १०११ खड्डे घेतले. या खड्ड्यांमध्ये रक्षा विसर्जित करुन त्यामध्ये १००० आंब्याच्या झाडांची व ११ नारळाच्या झाडांची लागवड केली.
तत्पूर्वी शहाबाई ह्यात असताना विष्णूपंत सानप आणि शहाबाई सानप यांनी २००६ पासून २०२१ पर्यंत १५ वर्षाच्या काळात २५०० हजार फळझाडांची लागवड केली.ऐवढेच नाही तर त्यांनी तेथेच वास्तव्यही केले . शहाबाई यांचे जन्मतः च फुफुस केवळ ३० टक्के काम करीत होते. अन्य शारीरिक व्याधीही पाठीशी होत्या . त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा संकल्प या दामपत्यांनी घेतला. त्यामुळेच शहाबाईंना वयाची सत्तरी ओलांडता आली. मात्र अखेरच्या टप्प्यात वाढत्या वयाबरोबरच अन्य शारीरिक व्याधीमुळे सलग दोन वर्षे त्या पुणे आणि नगर येथे उपचारार्थ रुग्णालयात राहिल्या मात्र वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी त्यांनी लावलेल्या आंब्याच्या शेतात करण्यात आला. अस्तिविसर्जण पैठण येथे केले तर रक्षा विसर्जिन मात्र शेतातच केले. त्याठिकाणी पुढे चालून
११ नारळ आणि १००० आंब्याच्या झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे शहाबाई यांच्या पश्चातही विष्णूपंत यांनी आपलं छोटंसं फार्महाऊस सोडले नाही ;आजही त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे. सकाळ – संध्याकाळी भक्तीमार्गात ते स्वत.ला वाहून घेतात आणि दिवसभर शेतात रमतात ; हा त्यांचा दिनक्रम नित्याचा झाला आहे.शेतीसाठी तहयात राबणाऱ्या या मातेची स्मृती जपण्यासाठी सानप कुटुंबातील सदस्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला ; वृक्षारोपण व वृक्षपुजेच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन पर्यावरण संवर्धनाकरिता एक पाऊल टाकले.
चौकट –
या भावंडांनी केली वृक्ष पूजा..!
——————————-संत , महंतांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वसंत सानप, सुरेखा नागरगोजे, राणी खाडे, सोनू वणवे, ज्ञानेश्वर सानप, सत्यवान सानप, डॉ.विवेकानंद सानप, संगीता खाडे, वैशाली शेकडे , वंदना नागरगोजे, कुसूम दराडे, भैरवनाथ डोळे, स्वप्नील सानप, मनोज राख, छत्रघुन गर्जे , दिपक गर्जे , अंकुश गर्जे, पोपटराव गर्जे, शहाजी गर्जे, अशोक गर्जे, शिवाजी गर्जे या भावंडांनी व डॉ . अविनाश नागरगोजे, पृथ्वीराज सानप, श्रावणी सानप ,पार्थ खाडे, श्लोक खाडे या नातवंडांनी स्वर्गीय शहाबाई सानप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावलेल्या वृक्षांची पुजा केली आणि; पर्यवरण संवर्धनाचा संदेश दिला..!
प्रतिक्रिया –
यावेळी महंत विकास महाराज वायसे म्हणाले, ” सौ.शहाबाई ऊर्फ बाई या मातोश्रींने आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नाती जपली. त्यांच्या कडे ‘फार्महाऊस’ ला अलेला कोणताच मनुष्य ‘विनमुख’ गेला नाही. जेवणाबरोबरच कोणतेना कोणते ‘फळ’ खायला मिळायचे; ही आठवण आज प्रत्येकाला येते. त्यांनी येथे लावलेली आडीच हजार फळझाडे आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ लावलेली एक हजार आकरा फळझाडे यापुढे पुढच्या पिढीला सतत ‘फळ’ देतील आणि यानिमित्ताने त्यांचे कायम स्मरण राहिलं.
” सामाजिक कार्यकर्त्या सविताताई यांनी ‘आई ‘ विषयावर व्याख्यान दिले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
आईच्या आठवणी. जपण्यासाठी १०११ झाडांची लागवड वसंत सानप यांची आईला अशीही आदरांजली
RELATED ARTICLES