जामखेड प्रतिनिधी
उन्हाळ्याचा उकाडा त्यात महावितरणचा अक्षम्य गोधळी कारभार नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे.
लाईट जाण्याचा येण्याचा कोणतीही वेळ निश्चित नाही. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली विज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दिवसभर लंपडाव झाला. संध्याकाळीही लाईट न आल्याने नागरिक वैतागून सायंकाळी ८ वाजता जामखेड महावितरणच्या कार्यालयात लहान मुले महिला पुरूष यांनी धडक जाऊन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आलेल्या या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महावितरणचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी महावितरणच्या आवरात उपलब्ध नाहीत. कोणीही फोन उचलत नाहीत
महावितरण कर्मचारी अहोरात्र काम करतात पण त्यांच्या कामाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अधिकारीच नाहीत. त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. सदर अधिकारी जामखेड येथे हजर नसतात आणि ते कोणाचेही फोन उचलत नाहीत. या गंभीर व अत्यावश्यक विषयावर राजकीय सामाजिक पुढारयांचे दूर्लक्ष दिसत आहे. वैतागून घरातुन सरळ लहान मुल, महिला व इतर लोक थेट महावितरण कार्यालयाच्या मागे असणाऱ्या 33 केव्ही फिडर कडे गेले होते यामधे जर कोणाच्या जीविताला धोका झाला आणि त्यातून काही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी महावितरण घेणार का हा मोठा प्रश्न निर्माण होतो. शहरातील पुढारयांनी या घटनेकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.