Homeव्हिडिओ बातम्या२४ तासात गून्हा उघडकीस ; दोनजण अटक मूद्देमाल जप्त , जामखेड पोलिसांची...

२४ तासात गून्हा उघडकीस ; दोनजण अटक मूद्देमाल जप्त , जामखेड पोलिसांची तत्परतेला यश

जामखेड पोलिसांच्या तत्पर कारवाईला यश; २४ तासांत गुन्हा उघडकीस,

दोनजण अटक:मुद्देमाल जप्त

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील जय हिंद चौक परिसरात झालेल्या दुकानफोडीच्या चोरीचा गुन्हा दाखल होताच जामखेड पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे हालवत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा ४ हजार ४७२ रुपयांचा मुद्देमाल तसेच दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कटर जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता ते दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत जय हिंद चौक, जामखेड येथील सचिन प्रोव्हिजन स्टोअर्स या किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील सुमारे ५४ हजार ९०० रुपये किमतीचे किराणा साहित्य चोरीला गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

तपासादरम्यान पोलिसांनी करण अशोक पवार (वय २०) आणि अनिल गौतम काळे (वय १९) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले .

त्यांच्या ताब्यातून ४ हजार ४७२ रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला असून, दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कटावणीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणातील किरण उर्फ खंड्या रावसाहेब काळे आणि रोहित अशोक काळे रा मिलिंदनगर भूतवडा रोड हे फरार आहेत.सदर प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली .पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी आणि SDPO सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित मोरे, सफौ शिवाजी कदम, पोहेकॉ संजय लोखंडे, ईश्वर माने, गणेश ढोबळे, दीपक बोराटे, कुलदीप घोळवे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, मपोका रत्नमाला हराळे आदी पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संजय लोखंडे करीत आहेत.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!