Homeव्हिडिओ बातम्या११मार्च १७९५ खर्डा लढाई ; विजय दिन आज खर्डा विजयाला २३० वर्ष...

११मार्च १७९५ खर्डा लढाई ; विजय दिन आज खर्डा विजयाला २३० वर्ष पुर्ण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने विजय दिन साजरा

 

११मार्च १७९५ खर्डा लढाई ; विजय दिन
आज खर्डा विजयाला २३० वर्ष पुर्ण

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने विजय दिन साजरा

जामखेड प्रतिनिधी

मराठाशौर्यदिनानिमित्ताने शुरवीरांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खर्डा ता जामखेड यांच्यावतीने मानवंदना देउन शिवछत्रपतींच्या मुर्तीचे पुजन करुन जयघोष करण्यात आला.
यावेळी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यात आला. आज खर्ड्याच्या लढाईला २३० वर्ष पुर्ण झाली. खर्डा येथील लढाईला येथूनच १५ किलो मीटर अंतरावर दौंडवाडी आहे. येथील रणटेकडीवरदेखील भगवा ध्वज लावुन जयघोष करुन मान वंदना देण्यात आली.
या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा उत्कृष्ट पध्दतीने विकास व्हावा आणि हा वारसा पिढ्यानपिढ्या जतन व्हावा हिच अपेक्षा शिवप्रेमींनी तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका यांचेवतीने करण्यात आली. वेळोवेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.तसेच किल्यावर तोफही बसवण्यातआली असुन किल्ल्यात सापडलेले तोफ~ गोळे व्यवस्थित रहावे म्हणून लोखंडी गेट बसवून तोफगोळे सुरक्षित ठेवण्यात आले.
पुरातत्व विभाग खर्डा किल्ल्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करत आहे. किल्ल्याच्या गेट वर पुरातत्व विभागाकडून अजुनही शिपाई ठेवण्यात आलेला नाही. वेळोवेळी मागणी करुनही दुर्लक्ष केले जाते. विधान परिषद सभापती आमदार प्रा राम शिंदे व रोहित पवार यांनी किल्ल्याच्या कामाकडे विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इतिहासात खर्डा लढाई ही मराठ्यांच्या पराक्रमाच्या शौर्याची आणि विजयाची म्हणून ओळख असलेली लढाई आहे. म्हणुन आज ११ मार्च २०२५ रोजी या लढाईला २३० वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने सर्व धारकरी शिवप्रेमीनीं तसेच सर्वपक्ष पदाधिकारी यांनी पुजन करुन मानवंदना देण्यात आली.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!