Homeव्हिडिओ बातम्यासिटीझन न्युज लोकार्पण संपन्न :; सामन्य जनतेच्या हक्कासाठी, सर्वांच्या न्यायासाठी, निर्भीड, निष्पक्ष...

सिटीझन न्युज लोकार्पण संपन्न :; सामन्य जनतेच्या हक्कासाठी, सर्वांच्या न्यायासाठी, निर्भीड, निष्पक्ष !

 

सिटीझन न्युज आपल्या सेवेत रुजू झाले आहे .

जामखेड प्रतिनिधी 9423391215

स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून पत्रकार यासीन शेख यांच्या सिटीझन न्युजचे लोकार्पण विविध क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी,न्यायासाठी जनतेला जागृत करणं तसेच आपल्या कर्तव्यांचीही जनतेला जाणीव करून देणे.तसेच राजकीय सामाजिक प्रश्नांवर सडेतोड निर्भीड निष्पक्ष लिखाण करण्याचे काम पत्रकार यासीन शेख हे गेल्या १८-२० वर्षापासून सातत्याने करत आहेत.यापुढे सिटीझन न्युज च्या माध्यमातून जामखेड कर्जत मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व सर्व सामान्य जनतेच्या न्यायासाठी निष्पक्ष लिखाण करतील. अशा भावना व्यक्त करत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा राजेंद्र पवार ,प्रा राहूल आहिरे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा यांनी शुभेच्छा दिल्या .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उमरभाई कूरेशी, यूवा नेते बीलाल शेख, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, बजरंग सरडे ,पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासीर पठाण ,पत्रकार मिठ्ठलाल नवलाखा, किरण रेडे, अविनाश बोधले पप्पुभाई सय्यद, आशोक वीर,तुकाराम अंदूरे,आयडी पाँईटचे सुंदर परदेशी ,सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक, सुबहान शेख ,कानिफनाथ नागरगोजे,ज्ञानदा इटरप्रायजेसचे मंगेश औचरे ,हसनभाई शेख,बाळासाहेब काटकर आदी उपस्थित होते .सिटीझन न्युज व पत्रकार यासीन शेख यांना  विविध क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिकांकडुन शुभेच्छा मिळत आहेत .

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!