Homeव्हिडिओ बातम्यासचिन (नाना) घुमरे मित्र परिवार कडून शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप. ...
सचिन (नाना) घुमरे मित्र परिवार कडून शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप. विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुऱ्हेवाडी व महारुळी येथे सामाजिक उपक्रम
सचिन (नाना) घुमरे मित्र परिवार कडून शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप.
विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुऱ्हेवाडी व महारुळी येथे सामाजिक उपक्रम

जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे.
वाढदिवसानिमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांच्या वतीने प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते तसेच समाजातील गरजू लोकांना मदत केली जाते.
यावर्षी दि १ जानेवारी २०२६ रोजी सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
गुऱ्हेवाडी महारुली येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांना सरपंच बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते रायटिंग पॅडचे वाटप करून साजरा करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे मित्र परिवाराच्या वतीने दिघोळ गणातील इतर गावात देखील शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड, स्कूल बॅग चे वाटप करून व समाजातील गरजू लोकांना मदत करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब लोंढे, नाना जाधव, दादा जाधव, नवनाथ जाधव, कल्याण जाधव, अर्जुन कोरडे, गौतम नाना कोरडे, महाराज धोंडीबा पवार, विकास कोरडे, अशोक जाधव, अंकुश मुळे, शामराव सातपुते, शरद चव्हाण, आप्पा कोरडे, उद्धव लोंढे, केरु जाधव, संतोष कोरडे, अशोक अनपट ,शिवनाथ अनपट, विशाल कोरडे, शाळेचे शिक्षक राऊत सर व माने सर, व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!