Homeव्हिडिओ बातम्यासंतोष गव्हाळे म्हणजे १०८ अम्बलंन्स! हँलो म्हणले की आलो म्हणणारा संतोष गव्हाळे...

संतोष गव्हाळे म्हणजे १०८ अम्बलंन्स! हँलो म्हणले की आलो म्हणणारा संतोष गव्हाळे :- डॉ भगवान मुरुमकर कमळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान नगराध्यक्ष सौ प्रांजलताई अमित चिंतामणी व २४ नगरसेवक भाजपाचेच नगरपरिषदेत दिसणार –

संतोष गव्हाळे म्हणजे १०८ ॲम्ब्युलन्स

हँलो म्हणले की आलो म्हणणारा संतोष गव्हाळे :- डॉ भगवान मुरुमकर
कमळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान
नगराध्यक्ष सौ प्रांजलताई अमित चिंतामणी व २४ नगरसेवक भाजपाचेच नगरपरिषदेत दिसणार

जामखेड प्रतिनिधी
मागच्या वेळी संतोष गव्हाळे फार थोड्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे संतोष गव्हाळे यांना ९ वर्षे वाट पहावा लागली आता मागच्या वेळी जे घडले ते परत नको घडायला. कारण कोणीही एक फोन केला, “हँलो म्हणले की आलो ५ मिनटात” म्हणणारा कार्यकर्ता संतोष गव्हाळे आहे. कोणाच्या मदतीला वेळेचे बंधन न पहाता धावून जाणारा कार्यकर्ता संतोष गव्हाळे सर्वाना माहिती आहे.

संतोष गव्हाळे यांना १२ नंबर प्रभागातील सर्व समस्या माहित आहेत. त्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रांजलताई अमित चिंतामणी व नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक १२ मधील उमेदवार संतोष गव्हाळे व मोहनमामा गडदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी सभापती तथा भाजपाचे निवडणूक प्रभारी डाॅ.भगवान मुरूमकर यांनी आवाहन केले आहे.भारतीय जनता पक्षाच्या
प्रभाग क्रमांक १२ मध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रांजलताई अमित चिंतामणी व नगरसेवकपदाचे उमेदवार संतोष गव्हाळे व मोहन मामा गडदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अमित चिंतामणी, प्रभारी डॉ भगवान मुरुमकर मनोज राजगुरू, धीरज रसाळ, उध्दव हुलगुंडे आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. प्रचारार्थ आयोजित सभेत डॉ भगवान मुरुमकर बोलत होते.
डॉ भगवान मुरुमकर पुढे म्हणाले की केंद्रात राज्यात सत्ता भाजपाची आहे. त्यामुळे
जामखेड नगर परिषदही भाजपाच्या ताब्यात येणार आहे.
सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहराचा विकास भाजपच करू शकते. समोरच्यांकडे फक्त विकासाचे गाजर आहे. सर्वांचे ऐका पण मत कमळाला द्या असे आवाहनही केले. यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधील महिला पुरूष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रभारी तथा माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू यांनी मानले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!