Homeव्हिडिओ बातम्याराष्ट्रवादीकडुन अहमदनगर लोकसभेसाठी आ रोहित पवारांची चर्चा ❓

राष्ट्रवादीकडुन अहमदनगर लोकसभेसाठी आ रोहित पवारांची चर्चा ❓

मुंबईत झाली आढावा बैठक संपन्न.

जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातल्या लोकसभेच्या दोन जागा आहेत.त्यापैकी दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.तर शिवसेना उध्दव ठाकरेंनी उत्तरेच्या जागेसाठी दावा केला आहे .त्या अनुषंगाने नूकतीच संभाव्य उमेदवाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारयांची मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .यामध्ये प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस व शेवगाव पाथर्डीचे नेते प्रताप ढाकणे व माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्यासह ‘अन्य एका नावाची’ चर्चा झाली असल्याचे समजते.मात्र अन् म्हणजे आ रोहित पवार यांचे नाव आहे काय याबाबत मोठी चर्चा ऐकायला मिळत आहे .
काही महिन्यांवर लोकसभा निवडणुक येवून ठेपली आहे .या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. त्यानुषंगाने दोन दिवसांपूर्वी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ‘संभाव्य उमेदवार कोण असावा याबाबत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
याबैठकीमध्ये, पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार, प्रांताध्यक्ष आ.जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे, मा.मंत्री आ.राजेश टोपे,महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदींच्या समोर संभाव्य नावांची चर्चा करण्यात आली.
यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते उपस्थित होते त्यामध्ये नगर व राहुरीतून माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व ज्येष्ठ नेते अरुण कडू पाटील, श्रीगोंद्यातून मा.आ.राहुल जगताप, कर्जत मधून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,शेवगाव पाथर्डी मधून प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे,जामखेडमधून प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदी उपस्थित होते. भाजपाचे विद्यमान खासदार सूजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ रोहित पवार यांच्यात खासदारकीची लढत होणार असल्याची मोठी चर्चा ऐकायला मिळत आहे .तसेच उद्या काँग्रेसपक्षाचीही लोकसभा उमेदवाराबाबत मुंबईत बैठक बोलावली आहे .

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!