Homeव्हिडिओ बातम्याभिंगारची 'ती' दुर्दैवी घटना डिजे मुळेच ? पोलिसांना लाठीचार्ज का करावा...

भिंगारची ‘ती’ दुर्दैवी घटना डिजे मुळेच ? पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला …? दिपक वाघस्कर मृत्यू आणि पोलीस लाठीचार्ज दोन्ही घटना वेगवेगळ्या -: पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन कोणाचाही मृत्यू दुर्दैवी घटना ; त्याचे राजकारण नको ! डिजे वाले नियम मानायला तयार मात्र अतिउत्साही कार्यकर्ते ?? आजही डिजे वाजणार ? पोलीसांनी सतर्क राहावे ; नागरिकांनी जागृत रहावे

भिंगारची ‘ती’ दुर्दैवी घटना डिजे मुळेच ?

पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला …?

दिपक वाघस्कर मृत्यू आणि पोलीस लाठीचार्ज दोन्ही घटना वेगवेगळ्या -: पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

कोणाचाही मृत्यू दुर्दैवी घटना ; त्याचे राजकारण नको !

डिजे वाले नियम मानायला तयार मात्र अतिउत्साही कार्यकर्ते ??

आजही डिजे वाजणार ?
पोलीसांनी सतर्क राहावे ; नागरिकांनी जागृत रहावे

सिटीझन प्रतिनिधी

अहिल्यानगर- भिंगारमध्ये शुक्लेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपक वाघस्कर यांचा ऐन गणेश विसर्जन काळात मृत्यू झाला, ही घटना भिंगारवासियांसह राज्यातल्या तमाम सहृदयी व्यक्तींसाठी नक्कीच क्लेशदायक आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेमागे पोलिसांचा लाठीचार्ज असल्याचा आरोप केला आहे. श्री गणेशाच्या स्थापनेपूर्वीही आमदार जगताप यांनी अहिल्यानगर शहराचे डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. डिवायएसपी टिपरसे यांचा हिंदू सणांना विरोध असल्याचं आमदार जगताप यांचं म्हणणं आहे. भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज करण्याचा आदेश नक्की कोणी दिला, हा खरं तर आमदार जगताप यांचा सवाल आहे.

दरम्यान, यासंदर्भात अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं, की घडलेली घटना निंदणीयच आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवर शंका आहे. दीपक वाघस्कर यांच्याबाबत घडलेली घटना ही साधारणः नऊ वाजेच्या सुमारास घडली. घरा जाताना ते रस्त्यात पडले. मंडळाचे कार्यकर्ते आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. त्यानंतर तब्बल ५० ते ५५ मिनिटांनी दोन मंडळातील ट्राँलीचा वाद झाला. पोलिसांनी डीजेच्या आवाजावर मर्यादा ठेवण्याचे आवाहन केले. सौम्य लाठीचार्ज केला. परंतू व्हायरल व्हिडीओत या दोन्ही घटना एकमेकांशी जोडल्या गेल्या. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, पोलीस नि:ष्पक्षपातीपणे या घटनेची चौकशी करत आहेत. दोषींवर कारवाई नक्की केली जाईल. शिवाय पोस्टमाँर्टम रिपोर्टनंतर हे सगळं प्रकरण समोर येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी व्यक्त केली आहे.


—————————–
श्री गणेश ही देवता खरं तर विघ्नहर्ता आहे. सर्वसामान्य दुःखितांचं दुःख, विघ्न किंवा संकट दूर करणाऱ्या या देवतेच्या विसर्जन मिरवणुकीतच विघ्न आलं आणि त्या विघ्नामुळे दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाला. या घटनेचा नक्की कोणत्या घटनेशी संबंध जोडायचा, हे प्रत्येकानं एकदा ठरवून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे कोणत्याही घटनेला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे भिंगारच्या या घटनेलासुद्धा दोन बाजू आहेत. त्यामुळे दोन्ही बाजू समजून न घेताच पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करुन स्वतःच न्यायाधिशाची भूमिका कोणीही पार पाडू नये, ही प्रगल्भ लोकशाहीची खरी ओळख आहे.

यादरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना लाठीचार्ज करण्याची आवश्यकताच का भासली, हा प्रश्नही विचारात घेणं महत्त्वाचं आहे. पोलिसांचा लाठीचार्ज आणि दीपक वाघस्कर यांचा मृत्यू या दोन्ही घटना भिन्न किंवा वेगळ्या आहेत, असं अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख असलेल्या एसपी मुम्मका सुदर्शन यांचं म्हणणं म्हणणं आहे.


—————————
वाघस्कर यांच्या मृत्युचं राजकारण होऊ नये…!
—————————-
काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमधील मुकुंदनगर भागात झालेल्या मारहाणीदरम्यान धीरज परदेशी या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली होती. परदेशी याच्या मृत्यूचं खापर एका विशिष्ट समाजाच्या लोकांवर फोडण्यात आलं होतं. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करावी, यासाठी रास्तारोको सह ठिय्या आंदोलनही करण्यात आलं होतं.

प्रत्यक्षात मयत धीरज परदेशी याच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोणी आणि किती रुपयांची आर्थिक मदत केली, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. तोच प्रकार भिंगारच्या दीपक वागस्कर यांच्याबाबतीत होऊ नये, मयत वाघस्कर यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा, त्या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या आधाराची आवश्यकता आहे. कोणाचाही मृत्यू ही दुर्दैवी घटना असते .त्या घटनेचे राजकारण करू नये . लोकप्रतिनिधींनी अशावेळी शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे मात्र कोणत्याही प्रकरणात राजकारण केले जात आहे. ही दुर्दैवी मानसिकता आहे. त्यामुळे या प्रकरणातही राजकारण होऊ नये, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.


—————————
दि २४ रोजी सायंकाळी काही गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले .यावेळी काही ठिकाणी डिजे जोरात वाजले आहेत . डिजे वाले बंदी मानायला तयार मात्र गणेश मंडळांचे अतिउत्साही कार्यकर्ते मानायला तयार दिसत नाहीत .डिजेला सुपारी दिली मग वाजव असा दबाव कार्यकर्त्यांकडून होतांना दिसत आहे .अशावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी भान ठेवण्याची गरज आहे .पोलिसांनी सतर्क राहण्याबरोबरच नागरिकांनी जागृत राहण्याची गरज आहे .प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!