Homeव्हिडिओ बातम्याबोरिवली जामखेड बसचा टायर फुटला :ड्रायव्हरचे प्रसंगावधान अपघात टळला

बोरिवली जामखेड बसचा टायर फुटला :ड्रायव्हरचे प्रसंगावधान अपघात टळला

बोरीवली ते जामखेड बसचा टायर फुटला

ड्रायव्हरचे प्रसंगावधान अपघात टळला

 

आता तरी लांब पल्ल्याला नव्या गाडी द्या

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड बस स्थानकाची व बसेची दूरावस्था कधी थांबणार कोण थांबवणार मोठा प्रश्न आहे.

 

बोरिवली जामखेड ही परत येत असताना वाघळूज घाटात टायर फुटला. भर उन्हात भर घाटात टायर फुटल्याने मोठा आवाज येऊन एकच हाहाकार उडाला पण चालकाने प्रसंगावधान लक्षात घेऊन सतर्क होत बस रस्त्याच्या कडेला आणत उभी केली. त्यामुळे होणार अपघात टळला.

बोरीवली ते जामखेड बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती.

सध्या जरी काही नवीन बस आलेल्या असल्या तरी अनेक जुन्या निकामी झालेल्या बस आहेत. अनेक वेळा रस्त्यात कोठेही बंद पडतात. यामुळे प्रवाशांचे हाल होतात.जुन्या बस, खराब झालेले टायर, गिअर बॉक्स बिघाड, इंजिनमध्ये बिघाड, यामुळे या बस रस्त्यावर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुर मारत मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण करतात. त्या चांगल्या प्रकारे दुरूस्त होउनच रस्त्यावर येणे आवश्यक आहे.अनेक वेळा असे दूर्दैवी घटना घडल्या आहेत. कर्मचारी व अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने बसचे देखभाल दुरुस्ती अनेक त्रुटी राहत असल्याचे बोलले जाते.

लांब पल्ल्यासाठी शक्यतो नवीन बस गाड्या सोडल्या पाहिजे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!