Homeव्हिडिओ बातम्याबैलपोळ्याच्या उत्साहावर चिंतेची छाया; खरिपाच्या पिकावर दुष्काळाचे सावट पोळा सणाचे साहित्यही...
बैलपोळ्याच्या उत्साहावर चिंतेची छाया; खरिपाच्या पिकावर दुष्काळाचे सावट पोळा सणाचे साहित्यही महागाले
बैलपोळ्याच्या उत्साहावर चिंतेची छाया; खरिपाच्या पिकावर दुष्काळाचे सावट
पोळा सणाचे साहित्यही महागाले
जामखेड प्रतिनिधी
सध्या पावसाने दडी मारल्यामुळे यंदाच्या श्रावणी बैलपोळा सणावर दुष्काळाचे मोठे सावट गडद झाले आहे. सलगच्या नैसर्गिक संकटामुळे आणि ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पावसाअभावी खरीप पिके करपून गेल्याने बळीराजा प्रचंड चिंतेत सापडला आहे.
येत्या १० सप्टेंबर २०२६ रोजी साजरा होणाऱ्या बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात या दुष्काळामुळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनाशी अतूट नाते असलेला आणि बळीराजाच्या कष्टाचे प्रतीक मानला जाणारा बैलपोळा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र, यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट असल्याने पोळ्याच्या उत्साहावर चिंतेची छाया पसरली आहे. पावसाने गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याने पिकांची अवस्था बिकट झाली असून, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा. करण्याच्या तयारीत आसल्याचे वास्तव चित्र पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागात पोळा हा केवळ धार्मिक अथवा पारंपरिक सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा सण आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला बैलजोडी असायची. शेतीची मशागत करण्यापासून ते शेतातील धान्य, शेतमाल बाजारपेठेत भाजीपाला किंवा इतर शेतमाल बाजारपेठेत पोहचविण्यासाठी बैलांचा मोठ्या प्रमाणातउपयोग होत असे. ज्यांच्याकडे बैलजोडी नसे, ते शेतकरी इतरांच्या बैलांची मेहनत घेत असत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत बैलांना अनन्यसाधारण महत्त्व होते.
काळ बदलला आणि आधुनिक यांत्रिक शेतीचा स्वीकार झाला. ट्रॅक्टर, रोटाबोटर आणि इत्तर यत्रांमुळे शेतीची अनेक कामे कमी वेळेत होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांकडील बैलजोड्यांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. तरीसुध्दा बैलपोळ्याचे महत्त्व मात्र कमी झालेले नाही, आजही पोळ्यादिवशी बैलांचे विधीवत पूजन करण्याची परंपरा ग्रामीण भागात उत्साहाने जपली जाते.
विविध आकारांचे आणि रंगांचे मातीचे बैल बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दरम्यान,गेल्या एक महिण्यापासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असून हिरवा चारा उपलब्ध होणे कठीण झाले आहे अशा स्थितीत दुष्काळाच्या सावटाखाला, साधेपणाने का होईना, पण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून पोळा साजरा करण्याची तयारी शेतक-यांनी सुरू केली आहे.

————
पोळ्याच्या दिवशी बैलांना विशेष महत्त्व दिले जाते. मात्र, यंदाची परिस्थिती या परंपरेसमोरही मोठे आव्हान घेऊन आली आहे. अनेक भागांतील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर जलस्रोतांमधील पाणीसाठाही कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने बैलांना पोळ्याच्या दिवशी भरपेट चारा देण्याची व पाण्याच्या डोहात धुण्याची परंपरा यंदा अडचणीत आली आहे.
बैलाच्या साजाचे भाव गगनाला
——–
बैलांची सजावट करताना शेतकरी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार साहित्याची खरेदी करत असतात. दुष्काळी स्थिती व गतवर्षीच्या तुलनेत यंदा साजाच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सध्या बाजारपेठेत म्होरकी, गोंडा म्होरकी, झुल, बाशिंग जोडी, चंगाळं-घुंगरू, पितळी शेंबी, कवडीमाळ, सुती दोरी, कासरा, बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी वापरले जाणारे वारणेस, पेंट यांचे भाव गतवर्षीच्या तुलनेत खुप वाढ झाल्याने सध्या तरी खरेदीसाठी ग्राहक नसल्याची माहिती व्यावसायिकाने दिली.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!