बीएड पदवीधारक माध्यमिक शिक्षकांना मिळाला न्याय :
सेवाजेष्ठतेनूसार मिळणार मूख्याध्यापकपद:
संस्थांच्या मनमानीला चाप:
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचे जाहीर केलेल्या 24 मार्च 2023 रोजीच्या राजपत्राने काही शिक्षण संस्थांनी आपापल्या सोयीनुसार अर्थ लावून मुख्याध्यापक या पदाच्या पदोन्नत्या मिळवून घेतल्या होत्या.यामुळे सेवा ज्येष्ठ असलेल्यांवर अन्याय झाला होता.
त्या विरोधात आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने 25 जानेवारी रोजी अन्यायग्रस्त शिक्षकांना दिलासा दिला.पदोन्नतीस पात्र असलेल्या माध्यमिक शिक्षकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच अन्याय दुर करण्यासाठी बीएड माध्यमिक पदवीधारक संघटनेने महाराष्ट्र शासनाकडे 24 मार्च 2023 चे राजपत्र असलेल्या तरतुदींचे स्पष्टीकरण द्यावे याकरिता विनंती केली. महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभागाच्या माध्यमातून 28 जानेवारी रोजी स्पष्टीकर जाहीर करून संभ्रम दूर केला.
दहावी किंवा बारावी व डीएड धारक शिक्षक हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची केवळ पदवी मिळाल्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा जेष्ठ ठरू शकत नाही. अशा शिक्षकाने ज्या दिवशी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीएड किंवा बीपी एड पदवी प्राप्त केल्यानंतर त्याची नेमणूक माध्यमिक शिक्षक म्हणून होणे गरजेचे आहे व त्या पदाला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची मान्यता आवश्यक आहे,डीएड पदवीधर शिक्षकांची सेवा जेष्ठता पदवी मिळाल्याच्या दिनांकापासून गृहीत धरली असल्यास व त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली असल्यास त्यांची पदोन्नती तात्काळ रद्द करून त्यांना आपल्या मूळ पदावर वापस करण्यात यावे.
तसेच पात्र असलेल्या माध्यमिक शिक्षकांना त्वरित मुख्याध्यापक या पदाकरिता पदोन्नती देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, असा आदेश महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आल्याने पात्र असलेल्या माध्यमिक शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे.
हा संभ्रम शिक्षकांमध्ये असलेला मतभेद दूर करणारा असून वाया गेलेले वातावरण पुन्हा बरोबर होईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य बीएड माध्यमिक पदवीधारक संघटना तसेच वर्धा जिल्हा बीएड माध्यमिक पदवीधारक संघटनेने महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215