पत्रकारांचा सत्कार व गुणगौरव
जामखेड प्रतिनिधी
६ जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येतो.या पत्रकार दिनाचे औचित्य साधून
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा राजेंद्र साहेबराव पवार मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, वैजीनाथ पोले, प्रा. लक्ष्मण ढेपे, डॉ. कैलास हजारे, दत्तात्रय सोले, बापूसाहेब शिंदे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, बापू ससाणे, संभाजी राळेभात, गणेश घायतडक आदिंसह राजेंद्र पवार मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकार अशोक निमोणकर, नासिर पठाण, यासीन शेख संजय वारभोग, सुदाम वराट, अशोक वीर, श्वेता गायकवाड, धनराज पवार, ओंकार दळवी, समीर शेख, पप्पू सय्यद, किरण रेडे, अविनाश बोधले, अजय अवसरे, सुजीत धनवे आदी पत्रकारांचा शाल, गुलाब पुष्प, पेन व डायरी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी वैजीनाथ पोले, शहाजी राळेभात, कैलास हजारे यासीन , श्वेता गायकवाड या यांनी पत्रकार दिनानिमित्त मनोगतं व्यक्त केली.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राजेंद्र पवार म्हणाले की, प्रगल्भ विचारांचा पत्रकार उन्मत्त सरकार व राज्यकर्त्यांना जागेवर आणण्याचे काम करू शकतो. आज देशातील अनेक प्रश्न आहेत.तसेच सोडवण्यासाठी माध्यमातून मांडण्याची गरज आहे. जामखेड तालुक्यातील पत्रकार निस्पृह व निष्पक्षपाती लिखाण करत आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. लक्ष्मण ढेपे यांनी मानले.
दि ६ जानेवारी रोजी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने तालुक्यातील पत्रकारांचा तहसील कार्यालयाच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे नायब तहसीलदार मनोज भोसेकर ,मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे ,तलाठी सुखदेव कारंडे, रमेश कांबळे आदी महसूस विभाग कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते .
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या वतीने शांतीनाथ अँक्वा येथे पत्रकारांचा सत्कार करण्यात केला होता .यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालूकाध्यक्ष उमरभाई कूरेशी, प्रा राहूल आहिरे ,रशीदभाई शेख, प्रकाश काळे, दादा महाडिक, मनोज कारले आदी उपस्थित होते .
————————–
पत्रकार लोकशाहीचे ,समाजाचे रक्षण करतात-: प्रा मधुकर राळेभात
————————-
स्वातंत्र्योत्तर काळात पत्रकारांना क्रांतीकारक व समाजसुधारक म्हणत होते. आजचा पत्रकार सेवक म्हणून काम करत आहे.
पत्रकार ही लोकशाहीची गरज आहे.
आजच्या काळात जरी पत्रकारांची संख्या वाढली असली तरी माध्यमांचे प्रकारही वाढलेले आहेत. आपल्या भागातील पत्रकारीता चांगली असून, पत्रकार, समाज, पुढारी व अधिकारी यांची चांगली नाळ जुळलेली आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर चांगले काम होत आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा विषय सरकारदरबारी प्रलंबित आहे. तो प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे .
पत्रकारांना शासनाने मानधन दिले पाहिजे. पत्रकार जनतेचे म्हणणे मांडतात. त्यानुसारच शासन धोरण ठरवत असते. पत्रकार लोकशाहीचे व समाजाचेही रक्षण करतात असे म्हटले तर वावगे ठरू नये .कारण समाजात एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडून न्याय मिळवून देणे म्हणजे समाजाचे संरक्षण करणे हे होय. ते काम पत्रकार करत आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.