नोकरिचे बनावट पत्र दिले.
पाच लाखाला गंडा घातला.
आठ वर्षांनी आरोपीला खर्डा पोलीसांनी केले जेरबंद
जामखेड प्रतिनिधी
सत्य हे जास्त काळ लपत नाही. आठ वर्षांपूर्वी नोकरिचे आमिष दाखवून पाच लाखाला फसवले गून्हा दाखल झाला मात्र आरोपी फरार झाला. खर्डा पोलिसांनी मनावर घेतले आणि आठ वर्षानी खर्डा पोलीसांनी मुंबई येथून आरोपीला अटक करून खर्डा येथे आणला. 
मोठ्या आधिकारयांशी ओळखी आहेत. नोकरी लावतो म्हणून नोकरिचे बनावट पत्रही दिले. विश्वास संपादन करून गोड गोड बोलत खर्डा येथील रामभाऊ थोरात यांना पाच लाख रुपयांना गंडा घालुन फरार असलेल्या आरोपीला खर्डा पोलीसांनी मुंबई येथून अटक केली आहे.
सन २०१७ मध्ये खर्डा येथील उत्तम रामभाऊ थोरात यांच्या मुलाला माणगाव जि. रायगड येथे तहसील कार्यालयात लिपीक या पदावर नोकरी लावतो म्हणून तेथेच शिपाई पदावर काम करणाऱ्या आरोपीने त्याच्या मोठ मोठ्या अधिकारयां समवेत चांगल्या ओळखी असल्याचे सांगून विश्वास संपादन करुन रामभाऊ थोरात यांच्याकडुन पाच लाख रुपये घेतले
. तसेच त्यांना माणगाव तसहिल कार्यालय येथील लिपीक पदावर नियुक्त केले बाबतची बनावट ऑर्डर तयार करुन त्यांची फसवणूक केली होती.सदरील घटनेचा खर्डा पोलीस स्टेशन ला दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी आरोपी मुरलीधर धर्मा नेटके रा.भोंजा ता.परांडा जि धाराशिव हल्ली रा.CBD, बेलापुर, पनवेल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.गुन्हा दाखल झाले पासुन यातील आरोपी हा फरार होता.
त्याचा वेळो वेळी शोध घेतला असता तो मिळुन येत नव्हता.
खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी एक पथक तयार करुन स्वतः पथकात राहुन सदर आरोपीची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवुन गेल्या दोन वर्षापासुन फरार असलेला आरोपी मुरलीधर धर्मा नेटके यास नवी मुंबई या ठिकाणावरुन ताब्यात घेतले आहे.
त्यास पुढील कारवाई करीता खर्डा पोलीस स्टेशन ला आणले असुन पुढील तपास उज्वलसिंह राजपुत हे करत आहेत.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदशनाखाली खर्डा प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक.उज्वलसिंह राजपुत पो.हवालदार संभाजी शेंडे, पो.कॉन्स्टेबल पंडीत हंबर्डे ,पो. कॉ.शशी म्हस्के, पो.कॉ अशोक बडे,पो.काँ. बाळु खाडे. यांनी सदर ची कारवाई केली आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
