Homeव्हिडिओ बातम्यानागरिकांचा फोन आला अन् समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक तातडीने हजर! समस्या मार्गी लावण्याचे...

नागरिकांचा फोन आला अन् समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक तातडीने हजर! समस्या मार्गी लावण्याचे बांधकाम समितीचे सभापती नगरसेवक मोहन पवार यांचे आश्वासन

नागरिकांचा फोन आला अन् समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक तातडीने हजर

समस्या मार्गी लावण्याचे बांधकाम समितीचे सभापती नगरसेवक मोहन पवार यांचे आश्वासन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकाचा नाली संदर्भात फोन आला आणि ताबडतोब बांधकाम समितीचे सभापती नगरसेवक मोहन पवार त्या ठिकाणी हजर झाले.
त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली असता अत्यंत बिकट अवस्था झाली होती. नालीमधुन दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर गटारीचे पाणी वाहत नसल्याने जमीनीत मूरत होते.

आसपासच्या बोअरवेलमधील पाणीही दुर्गधीयुक्त येत असल्याचेही नागरीकांनी सांगितले.तातडीने नगरपरीषदेच्या मुकादम राजु गायकवाड यांना लगेच स्पाॅटवर बोलावुन घेतले. सदर समस्येचे निराकरण करण्यासाठी काय काय उपाययोजना करावी लागेल याचीही चर्चा करण्यात आली.आणि रितसर एक अर्ज नगरपरीषदेकडे देण्यास सांगितले. सोमवारी निश्चितच आपले काम मार्गी लागेल असे आश्वासन दिले. आपण प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक असतानादेखील आमचा प्रभाग क्रमांक ८ मधील समस्या असुन देखील फोन केल्याबरोबर तातडीने समस्या पाहण्यासाठी हजर झाल्याबद्दल नागरीकांनी नगरसेवक मोहन पवार यांचे आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले.

गेली अनेक वर्षांपासून जामखेड शहरातील नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे भाजपा नेते व नगरपरिषदेचे बांधकाम समितीचे कार्यकुशल सभापती मोहन पवार होय.सभापती प्रा राम शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय नगरसेवक सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार व सौ नंदाताई होळकर यांचे पती प्रवीण होळकर यांनी नागरिकांच्या एका फोनवर हजर होऊन समस्या मार्गी लावण्यासाठी तजवीज करण्याची तयारी केली आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!