Homeव्हिडिओ बातम्यानर्स शबनम शेख आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणी तपासाला योग्य दिशा...

नर्स शबनम शेख आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणी तपासाला योग्य दिशा व वेग द्यावा .शबनम च्या आईवडीलांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी निवेदन

 

नर्स शबनम शेख आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणी तपासाला योग्य दिशा व वेग द्यावा

शबनम च्या आईवडीलांचे न्यायासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील लोंढे हाँस्पीटल मध्ये नर्स शबनम शेख ची आत्महत्या झाली होती .आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा  अलि ख्वाजा पठाण रा आष्टी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणाचा तपास संथ गतीने होत आहे .सदर तपासला योग्य दिशा व वेग देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मयत शबनम शेख च्या आईवडिलांनी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शबनम दस्तगीर शेख ही जामखेड येथील लोंढे हाँस्पीटल येथे दि. २३/०४/२०२६ रोजी मयत झालेली आढळून आली तिच्या मृत्युस कारणीभुत असलेला आरोपी अली खाजा पठाण रा आष्टी जि बीड याच्या विरुद्ध मयताची आई सौ. सैनाज दस्तगीर शेख यांच्या फिर्यादीवरून FIR NA 289/2006 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे .

परंतु जामखेड पोलीस स्टेशन आरोपीला कुणाच्या तरी सांगण्यावरून मदत करत असलाची खात्रीलायक संशय येत आहे. संशयाचे खालील प्रमाणे
कारणे आहेत .
① माझा फिर्याद घेण्यास विलंब करने

② मी दिलेल्या जबाबानुसार फिर्याद नोंद न करणे.

③ आजपर्यंत तपासकामी आमच्या घरी येऊन मयताच्या मूलांचे , भावाची, वडिलांचे शेजाऱ्यांचे जबाब चौकशीकामी न घेणे.
४) ज्या हाँस्पीटल मध्ये मृत्यु झाला आहे त्या हॉस्पिटलवरून आरोपीने शेवटचा फोन काँल केला होता .तेथील नंबरचे CDR व CCTV फुटेज न तपासणे (नंबर -9503448876) ③ हाँस्पीटल मधील कर्मचाऱ्यांचे जवाब न नोंदवणे.

⑥ माझ्या मुलीच्या फोनचे तसेच , तिच्या भावाच्या फोनवर आरोपी वेळोवेळी फोन करत होता यांचे CDR न तपासणे. (मयत मुलीचा ,तिच्या भावाचा नंबर आरोपीचा नंबरचे CDR कारून ह्या नंबर वर मयताला किती व कधी फोन थाले तसेच तिच्या भावाच्या फोनवर कीती व कधी कधी फोन आले हे काहीही बघितले नाही .

⑧ आज तागायत वारंवार मागणी करुनही सुद्धा मृत्यूनोंदणी करणेसाठी पोस्टमार्टम अहवाल न देणे.

⑨ पोस्टमार्टम साठी अवयव नाशिकला पाठविणे साठी २० दिवसापेक्षा जास्त कालावधी लावणे.

आरोपीने 25/5/2016 रोजी मला फिर्यादी म्हणून केस केलिस म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली याची NCR NO 4221 2026 नोंद केली असतांना ही त्याची कसलीही दखल न घेणे.

असे अनेक मुद्द्यांवरून जामखेड पोलीसांच्या तपासांवर प्रश्नचिन्ह उपब्थित होत आहेत. आम्ही गरीब लोक असुन मोलमजुरी करून उपजिवीका भागवणारे आहोत. आमची तरूण मुलगी एका गुंड मानसीकता असलेल्या, वाळुचा धंदा करणारा चतुर अली खाजा पठाण याच्या त्रासामुळे वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरीक पिळवणूक, ब्लॅकमेलिंग धमकी मुळे आत्महत्या झालेली आहे.

तरी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्हाच्या संबंधीत पोलीस स्टेशनला अवगत करून आदेश द्यावेत व आमच्या कुटुंबाला न्याय दावा अशी नम्र विनंती मयत शबनम शेख च्या आईवडीलांनी केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य .
उपविभागीय पोलीस अधिक्षक, कर्जत .पोलीस निरीक्षक जामखेड .
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.
राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!