Homeव्हिडिओ बातम्याधामणगाव शाळेतील शिक्षक स्वामी शिवानंद यांचे र्‍हदयविकाराने निधन

धामणगाव शाळेतील शिक्षक स्वामी शिवानंद यांचे र्‍हदयविकाराने निधन

जामखेड प्रतिनिधी

  1. जामखेड तालुक्यातील धामणगाव येथीलश्री संत नंदराम महाराज विद्यालयातील  शिक्षक स्वामी शिवानंद सोमेश्वर (वय ४४) यांचे दि. ०३/१२/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.स्वामी शिवानंद सोमेश्वर यांच्या निधनामुळे  धामणगाव, जामखेड,तसेच त्यांचे गाव गूडसूर ता. उदगीर परिसरात शोककळा पसरली आहे.स्वामी सरांचा स्वभाव सर्व समावेशक होता सर्वांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असायचे श्री संत नंदराम महाराज विद्यालय धामणगांव ता. जामखेड येथे सुरूवातीपासून गेल्या वीस वर्षांपासून शिक्षक तसेच प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. १२ वर्षापुर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांचे बायपास झाले होते. रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला ताबडतोब त्यांना दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत उशीर झाला होता.अंत्यविधी दि. ०४/१२/२०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता गूडसूर ता. उदगीर जि. लातूर याठिकाणी होणार आहे.
    स्वामी सरांच्या मागे आई वडील, पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!