दिघोळ फाटा येथे इंडीका कार – लिटल स्टार स्कूल बस धडक बस पलटी ; ४० विद्यार्थी जखमी: स्कुल बसकडून शासनाचे नियम धाब्यावर ??
दिघोळ फाटा येथे इंडीका कार स्कूल धडक
लिटल स्टार बस स्कूल बस पलटी ; ४० विद्यार्थी जखमी:
स्कुल बसकडून शासनाचे नियम धाब्यावर ??
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील दिघोळ जातेगाव फाटा येथे इंडीका कार व
लिटल स्टार स्कुल बसची समोरचा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत .याबाबत खर्डा पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे .इंडीका कार दिघोळ कडुन खर्डयाकडे येत होती तर स्कुल बस खर्डा कडून जातेगाव फाट्यावर आली असता समोरा समोर धडक झाली .
स्कुल बस दुभाजकावर जाऊन धडकून पलटी झाली .यामध्ये बसमधील ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत .
यावेळी नागरिकांनी तत्परता दाखवत स्कुल बस मध्ये अडकलेले विद्यार्थी बाहेर काढले . नागरिकांनी इंडीका कार ड्रायवरला चांगलाच चोप दिला. दरम्यान आलेल्या रूग्णवाहिकेतुन जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठविले .दिघोळ जातेगाव फाटा परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मोठी मदत केली.
यावेळी खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट दिली .घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांना पहाण्याची घटनास्थळी धाव घेतली .
सदर स्कुल बसला ४० विद्यार्थी खचाखच भरून वाहतुक करण्याचा परवाना आहे का ? सदर स्कुल बसला शासन नियमाच्या कालमर्यादानुसार रोडवर चालण्याचा परवाना आहे का ?? तीन सीट घेऊन चाललेल्या मोटारसायकलवर पोलीस कारवाई करतात मग या बसमधील विद्यार्थी संख्या पोलिसांना दिसत नाही का ?? असे प्रश्न नागरिकांनी चर्चेतून उपस्थित केले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!