Homeव्हिडिओ बातम्याडॉ भगवान मुरूमकर यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड  अनूभवी, आभ्यासु...

डॉ भगवान मुरूमकर यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड  अनूभवी, आभ्यासु नेतृत्वला मोठी जवाबदारी 

डॉ भगवान मुरूमकर यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

 अनूभवी, आभ्यासु नेतृत्वला मोठी जवाबदारी

जामखेड प्रतिनिधी

गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे काम करणारे, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

विधान परिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या निष्ठावान कार्याची दखल घेत त्यांना ही मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

डॉ. भगवान मुरुमकर यांच्या निवडीचा अधिकृत कार्यक्रम नुकताच मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे पार पडला. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी जिप. सदस्य अशोक खेडकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कार्ले,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अजय काशीद,जामखेड भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे,मा. उपसभापती रवी दादा सुरवसे,मा. जिल्हा प. सदस्य सोमनाथ पाचरणे,राहुल चोरगे, भाऊ गरड आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भगवान मुरुमकर हे जामखेड तालुक्यातील एक अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व आहे. सलग ५ वर्षे जामखेड पंचायत समितीचे सभापती,१० वर्षे पंचायत समिती सदस्य,५ वर्षे साकत गावचे सरपंच म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या या नेतृत्वाला किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने नक्कीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!