Homeव्हिडिओ बातम्याजामखेड बाजार समितीच्या वतीने ८०मेट्रिक टन वजनी काटा सूरू:शेतकरयांनी लाभ घेण्याचे सभापती...

जामखेड बाजार समितीच्या वतीने ८०मेट्रिक टन वजनी काटा सूरू:शेतकरयांनी लाभ घेण्याचे सभापती पै शरद कारले यांचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी

विधानपरिषद सभापती आ प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी व बाजार समितीच्या आवारातील व्यापारी यांच्यासाठी अनेक सोईसुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. दि २८ रोजी बाजार समितीने शेतकरयांच्या हितासाठी ८० मॅटिक टन वजनकाटा बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू केला असून सर्व शेतकरी व व्यापारी बांधवानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै. शरद कारले यांनी केले.

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांना सोईसुविधांची उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व संचालक मंडळाने आणखी एक पाऊल उचलेले आहे.

दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता पार पडलेल्या उद्घाटनप्रसंगी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट, संचालक सचिन घुमरे, सुधीर राळेभात, डॉ सिताराम ससाने, बबन हुलगुंडे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, गजानन शिंदे, सचिव वाहेद सय्यद, उपसचिव ढगे साहेब, व्यापारी महेंद्र बोरा, रामहरी गंडाळ फिरोज कुरेशी प्रगतशील शेतकरी महादेव डोके, संजय डोके आदि मान्यवरांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!