Homeव्हिडिओ बातम्याजामखेड उपनगराध्यक्षांचे नगरसेवकपद जाणार की राहणार ?? जातप्रमाणपत्रावर यूक्तिवाद पुर्ण ,निर्णय राखीव...

जामखेड उपनगराध्यक्षांचे नगरसेवकपद जाणार की राहणार ?? जातप्रमाणपत्रावर यूक्तिवाद पुर्ण ,निर्णय राखीव ,सभापती प्रा राम शिंदे काय भुमिका घेणार ??

जामखेड उपनगराध्यक्षांचे नगरसेवकपद जाणार की राहणार ??

ऋषिकेश खरातांच्या न्यायालयीन लढ्याला  यश मिळणार ??

जातप्रमाणपत्र वादावर युक्तिवाद पूर्ण, निर्णय राखीव

सभापती राम शिंदे काय भूमिका घेणार?

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदवर निवडणुकीतील वॉर्ड क्र. ३ मधील ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक पोपट राळेभात यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. या प्रभागातील पराभूत उमेदवार ऋषिकेश विष्णू खरात यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर अहिल्यानगर येथील जातपडताळणी समितीसमोर दि ४ जून २०२६ रोजी अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला आहे . खरात यांच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळणार असे स्पष्ट दिसत आहे .मात्र समितीने हा निर्णय न्यायनिर्णयासाठी राखीव ठेवला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षांचे नगरसेवकपद राहणार की जाणार, याची कमालीची उत्सुकता जामखेडवासियांमध्ये निर्माण झाली आहे.

नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्र. ३ मधून ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून उपनगराध्यक्ष विजयी झाले होते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवताना सादर केलेले जातप्रमाणपत्र चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचा गंभीर आरोप पराभूत उमेदवार ऋषिकेश खरात यांनी केला आहे. खरात यांनी २९ जानेवारी रोजी जातपडताळणी समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराच्या दाव्यानुसार जातप्रमाणपत्र काढताना २९ जुलै १९१८ रोजीचा शिऊर गावचा ‘गाव नमुना १४’ जोडण्यात आला आहे, जो पूर्णपणे बनावट स्वरूपाचा आहे. या गाव नमुन्यात उल्लेख असलेल्या व्यक्तीचा आणि उपनगराध्यक्षांच्या वंशावळीचा कोणताही संबंध नाही. उपनगराध्यक्षांची सर्व मूळ कागदपत्रे ही ‘मराठा’

जातीची असून, त्यांनी केवळ नावातील साधर्म्याचा (साम्य) गैरवापर करून हे ओबीसी प्रमाणपत्र मिळवले आहे.
उपनगराध्यक्षांनी हा पुरावा आपल्या आजोळचा असल्याचा दावा केला होता, मात्र तक्रारदाराने तहसील कार्यालय आणि संबंधित गावात चौकशी केली असता, तिथं आजोळचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
या गंभीर आरोपानंतर अहिल्यानगर येथील जातपडताळणी समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मे आणि जूनमध्ये यांवर चारवेळा सविस्तर सुनावणी झाली. (नोंदः तारखांमधील प्रशासकीय नोंदीनुसार) अखेर ४ जून २०२६ रोजी या प्रकरणावर दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पार पडला. समितीने आता या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.

जातपडताळणी समितीचा हा आगामी निर्णय जामखेडच्या स्थानिक राजकारणाला कोणती कलाटणी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
——-
सभापती राम शिंदे काय भूमिका घेणार?
———-

जामखेड नगरपरिषदेवर सध्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. उपनगराध्यक्षः हे सत्ताधारी गटाचे असल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. या कायदेशीर पेचप्रसंगामुळे विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे आता कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!