जामखेडला मोक्कारांची दहशत वाढली ?
मंदिरात दर्शनासाठी गेले असता नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घातला .
तरूण गंभीर जखमी
अतिदक्षता विभागात उपचार सुरू
जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गून्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
इथं मोटारसायकल का लावली तुम्ही मंदिरात जायचे नाही असे म्हणत मारहाण करत मंदिरासमोर नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घातला या मारहाणीत फीर्यादी व मुकुंद रघुनाथ पोकळे हे गंभीर जखमी झाले असून अहिल्यानगर येथे खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .
बाळु उर्फ दिपक मनोहर खरात बटेवाडी यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत शिवाजी मधुकर मोरे वय 53 वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा. पोकळेवस्ती, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि 15/06/2026 रोजी दुपारी 02/00 वा. चे सुमारास फिर्यादी शिवाजी मोरे व मुकुंद रघुनाथ पोकळे रा. पोकळेवस्ती, जामखेड असे दोघे मित्र मुकुंदच्या मोटार सायकलवरून जामखेड येथुन देवदैठण येथे देव दर्शना करिता गेलो होतो. तेथून दर्शन करुन आम्ही दुपारी 04/30 वा.चे सुमारास बटेवाडी शिवारातील खर्डा रोड वरिल मारुती मंदीर येथे दर्शन करिता थांबलो व मोटार सायकल मंदीरा समोर लावली व दर्शना करिता मंदिरात जात असतांना त्याठिकाणी एक व्यक्ती तेथे उभा होता व तो दारु पिलेला होता तो आम्हाला म्हणाला तुम्ही मोटार सायकल इथे का लावली तुम्ही मंदिरात जायचे नाही असे म्हणाला व आमचे मोटार सायकलची चावी काढुन घेतली व मोटार सायकल खाली पाडली त्यावेळी मोटार सायकलवर बसलेला मुकुंद पोकळे हा पण खाली पडला त्यावेळी फिर्यादीने त्यास उठवत असतांना सदर आरोपीने मंदिराजवळ असलेल्या नारळ फोडण्याचा दगड मुकंद पोकळे याचे डोक्यात मारला व मुकुंद पोकळे हा खाली पडला व त्याचे डोक्यास दगड लागल्याने गंभीर जखमी होऊन त्यातुन रक्त येऊ लागले.तेव्हा त्यास उचलण्यासाठी फीर्यादी गेले असता आरोपीने तोच दगड फिर्यादीच्या डोक्यात मारला व उजवे खांद्यावर व पायाला दगड मारला त्यावेळी वेदना होवु लागल्या व डोक्यातुन ही रक्त येत लागले .
तेव्हा फिर्यादीने स्वतःचा शर्ट काढून मुकुंद पोकळे याचे डोक्यावर बांधला व मोटार सायकल चालु करुन मुकुंद यास मोटार सायकलवर बसवले त्यानंतर आरोपी व्यक्ती म्हणाला की, माझे नाव बाळु आहे . तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले तर तुमचे काही खरे नाही असे म्हणुन दमदाटी केली त्या झटापटीत मुकंद पोकळे याचा विओ कंपनीचा मोबाईल कोठेतीर पडुन गहाळ झाला आहे. त्यानंतर सदर ठिकाणी जमलेल्या लोकांन कडुन सदर व्यक्तीचे नाव बाळु उर्फ दिपक मनोहर खरात रा. बटेवाडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर असे असल्याचे समजले.
जखमी मुकुंद पोकळे व फीर्यादी मोटार सायकलवर पवार हॉस्पिटल जामखेड येथे आले व तेथुन औषधोपचार घेवुन अहिल्यानगर येथे खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत . मुकुंद पोकळे हा सध्या बेशुध्द असुन तो उपचार घेत आहे. 
या प्रकरणी शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून बाळु उर्फ दिपक मनोहर खरात रा. बटेवाडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर याच्या विरोधात मुकुंद पोकळे व फिर्यादी जीवे मारण्याचा उद्देशाने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यांना मारुती मंदिर बटेवाडी येथील मोटार सायकल इथं का लावली ,तुम्ही मंदिरात जायचे नाही ! म्हणत दगडाने मारहाण करुन जिवे मारणेचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अशा गून्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे . पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर संपत कन्हेरे करत आहेत.

