Homeव्हिडिओ बातम्याजातीपातीचे राजकारण न करता कामाचा माणुस बघा - महेश निमोणकर अमिष,...

जातीपातीचे राजकारण न करता कामाचा माणुस बघा – महेश निमोणकर अमिष, प्रलोभनाला बळी पडु नका मत घड्याळाला द्या – संध्या सोनवणे नगरसेवक नजमा नदीम सय्यद व मिठ्ठलाल नवलाखा यांच्या प्रभाग सात मध्ये प्रचाराचा शुभारंभ

जातीपातीचे राजकारण न करता कामाचा माणुस बघा – महेश निमोणकर
अमिष, प्रलोभनाला बळी पडु नका मत घड्याळाला द्या – संध्या सोनवणे

नगरसेवक नजमा नदीम सय्यद व मिठ्ठलाल नवलाखा यांच्या प्रभाग सात मध्ये प्रचाराचा शुभारंभ

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगर परिषद निवडणुकीत
आमच्या समोर मोठ मोठे लोक आहेत मात्र लोक आमच्या बरोबर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जामखेडचा विकास करून जनतेला मुलभूत सुविधा देण्यासाठी व स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी, जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी नगरपरिषदचे स्वतंत्र दवाखाना करून शहराच्या सर्वागिण विकासासाठी आम्ही निवडणुकीला उभे आहोत.

जातीपातीचे राजकारण न करता आपल्या कामाचा माणुस म्हणुन आमच्या कडे पहा असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांनी केले. प्रभाग क्रमांक सात मध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सुवर्णा महेश निमोणकर व नगरसेवक पदाचे उमेदवार नजमा नदीम सय्यद व मिठ्ठलाल नवलाखा यांच्या प्रचाराचा नारळ तपनेश्वर येथील महादेव मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत फोडुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलतांना महेश निमोणकर म्हणाले की कोरोना काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांना स्वतः नागरिकांमध्ये जाऊन मास्क हँडवाँश देत हिम्मत धैर्य देण्याचे काम केले. जात पात पाहीली नाही. महासंग्राम युवा मंचच्या वतीने मोफत पाणी वाटप केले.
अनेकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संध्याताई सोनवणे म्हणाल्या की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडक्या बहिणीं म्हणजे महिला भगिनींचा आमला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी आमच्या बरोबर फोटो काढलेल्या बचत गटाच्या महिलांना फोन आले. लोकप्रतिनिधींचा असा दबाव चांगली बाब नाही. तेव्हा सर्वांनी अशा दबावाला, कोणत्याही आमिषाला बळी पडून आपले मत वाया घालवू नका. प्रभाग क्रमांक सात मध्ये नदीम सय्यद व मिठ्ठलाल नवलाखा यांचा लोकसंपर्क मोठा आहे. समाजातील विविध घटकातील गेलेले. सामाजिक जाणीवा असलेले उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महेश निमोणकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा सुवर्णा महेश निमोणकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून जामखेडच्या विकासासाठी घड्याळाला मत द्या असे आवाहन संध्या सोनवणे यांनी केले.
यावेळी प्रभाग क्रमांक सात मधील महिला पुरूष तरूण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!