Homeव्हिडिओ बातम्याखर्डा येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबीर संपन्न. मराठी, उर्दू शाळेतील मुलीचा...

खर्डा येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबीर संपन्न. मराठी, उर्दू शाळेतील मुलीचा मोठा सहभाग

खर्डा येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबीर संपन्न
मराठी, उर्दू शाळेतील मुलींचा मोठा सहभाग

जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमधील मुलींना स्वसंरक्षण व जीवनकौशल्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने
खर्डा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या योजनेअंतर्गत शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला . यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करून सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू मुख्याध्यापक मोमीन हुसेन बादशाह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) मुख्याध्यापक दत्तात्रय आंधळकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) मुख्याध्यापक बाबुराव गिते यांची प्रमुख उपस्थितीत पार पडले . राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमधील मुलींना स्वसंरक्षण व जीवनकौशल्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

दहा दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थिनींना योग, ध्यान, प्राणायाम, सूर्यनमस्कार तसेच शरीर संतुलन व योग्य आसनशैलीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय किशोरवयीन आरोग्य, शिस्तबद्ध जीवनशैली, मानवी शरीररचना, सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वे आणि आत्मरक्षणाच्या मूलभूत कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
समारोपप्रसंगी मुख्याध्यापक मोमीन हुसेन बादशाह यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले की, अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे शैक्षणिक प्रगती बरोबर मानसिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळते. ध्यान, प्राणायाम, योगासन व मैदानी खेळामुळे बौद्धिक क्षमते बरोबर शारीरिक क्षमता ही वाढते.आत्मसंरक्षणाची कला आत्मसात केल्याने मुली अधिक आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. स्वतःच्या सुरक्षिततेसोबतच समाज व देशाच्या रक्षणासाठीही सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिना कुरेशी,दिगंबर सातारकर, अतिक कुरेशी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक रवींद्र कुलकर्णी, प्रकाश सोनटक्के यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राथमिक शिक्षक शेख अब्दुल मुईद, अशपाक काझी, समीना सय्यद, श्रीहरी साबळे, अनंता गायकवाड, निसार सय्यद, कृतांजली वराडे, कौशल्य गव्हाणे, सुवर्णा मानेकर, आशा सोळसे, जानकीराम खामगाळ , राहुल पटेकर , गणेश वाघ , रवी पवार, रिता कुलकर्णी, सुनिता जावळे, क्रांती मिरगणे यांनी परिश्रम घेतले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू सह विद्यार्थी पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!