कुख्यात गुंड निलेश घायवळला मोक्का न्यायालयाची क्लीन चिट,
निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
घायवळ चे गायवळ करून फरार



याशिवाय इतर साक्षीदार आणि पंच साक्षीदारांनीही सरकारी पक्षाला पाठिंबा दिला नाही. पुराव्यांच्या अभावामुळे विशेष मोक्का न्यायालयाने घायवळसह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सध्या निलेश घायवळ पोलिसांना गुंगारा देऊन परदेशात फरार झाला आहे .
त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र, त्याने पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या आडनावात “घायवळ” ऐवजी “गायवळ” असे नाव वापरल्याचे आढळले होते. याचा फायदा घेऊन निलेश घायवळ युरोपमध्ये पळून गेला होता.
तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्रस घायवळने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केला नाही आणि हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हिसा मिळवून युरोपला फिरायला गेला होता.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215