Homeव्हिडिओ बातम्याएक लाख फँमिली फंड खाते २०२५ पर्यंत उघडण्याचा एच यू गुगळे पतसंस्थेचा...

एक लाख फँमिली फंड खाते २०२५ पर्यंत उघडण्याचा एच यू गुगळे पतसंस्थेचा मानस: गावोगावी शाळेतून अभियानाला मोठा प्रतिसाद: 

*एक लाख फँमिली फंड खाते २०२५ पर्यंत उघडण्याचा एच यू गुगळे पतसंस्थेचा मानस:*

 

*गावोगावी शाळेतून अभियानाला मोठा प्रतिसाद:*

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील एच यू गुगळे पतसंस्थेची “फँमिली फंड न कळत बचत योजना” दिवसेंदिवस विस्तारत असुन जामखेड तालुक्यात घरोघरी पोहचत आहे. एच यू गुगळे पतसंस्थेचे चेअरमन रमेशभाऊ गुगळे यांचा २०२५ पर्यंत एक लाख फँमिली फंड खाते उघडण्याचा मानस आहे.

त्या अनुषंगाने चेअरमन रमेशभाऊ गुगळे यांच्या संकल्पनेतून व व्यवस्थापक वैभव कुलकर्णी व सहव्यवस्थापक जुबेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नूकतेच शहरातील लोकमान्यच्या मराठी मुलांच्या शाळेत सहव्यवस्थापक जुबेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश किंबहुणे, वैशाली ढवळे यांनी ७५० खाते उघडले आहेत. याकामी लोकमान्य संस्थेचे कोषाध्यक्ष उमेश देशमुख व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना राळेभात यांनी मोलाचे सहकार्य केले.

फँमिली फंड योजनेचा उद्देश असा की लहान वयातच मुलांना बचतीची सवय लागावी. बँकींग क्षेत्राशी व बँकींग व्यवहाराचे ज्ञान मिळावे. अनाठायी व अनावश्यक खर्च कमी व्हावा. खाऊच्या नावाखाली तेलकट असे आरोग्यास घातक पदार्थ खाणे बंद व्हावे. पालक व मुलांचा सुसंवाद वाढावा असे उद्देश एच यू गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यात घराघरात पोहोचवले जात आहेत.

तालुक्यातील १८१ शाळांपैकी केवळ २१शाळेत ३ हजारांवर फँमिली फंडचे खाते उघडण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्या ज्या घरात “फँमिली फंड” खात्याचा डबा गेला आहे त्या घरात पैसे घेण्यासाठी मूलांचा पालकांशी सुसंवाद वाढलेला दिसत आहे. यातुन पालकवर्गात एक वेगळा आनंद दिसत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!