उत्तम आरोग्य ही स्वतःची तसेच देशाची संपत्ती आहे -:प्रांजल चिंतामणी रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचा आरोग्यादायी सामाजिक उपक्रम कौतुकास्पद १५५ रुग्णांनी घेतलमो मोफत अँक्युप्रेशर उपचाराचा लाभ
आपले आरोग्य चांगले असेल तर आपण समाजाची देशाची चांगली सेवा करू शकतो .आपले चांगले आरोग्य ही आपल्या बरोबरच देशाची खरी संपत्ती आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयींचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मोबाईलचा अतिवापर, सकाळी उशिरा उठणे,रात्री उशिरापर्यंत जागणे यामुळे अनेक शारीरिक व मानसिक त्रास उद्भवू शकतात. रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीने नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेले सामाजिक उपक्रम दिशादर्शक आहेत. असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी केले .
रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी आयोजित ॲक्युप्रेशर उपचार शिबिराचा समारोप ५ सप्टेंबर रोजी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा चिंतामणी या अध्यक्षस्थानी बोलत होत्या.३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान आयोजित या शिबिरात तब्बल १५५ रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला.या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉ. एम. ए. चायनान व त्यांच्या टीमने रुग्णांना अॅक्युप्रेशर उपचार देत विशेष सहकार्य केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे अध्यक्ष डॉ.सादेख पठाण, उपाध्यक्ष प्रफुल सोळंकी, सचिव अरुण उगले, मार्गदर्शक डाॅ. प्रशांत गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार ,प्रा. संभाजी मुळे,सुनिल उगले,बाळासाहेब पेचे,केतन चोरडिया, डाॅ.पल्लवी गायकवाड ,सौ मत्सगंधा उगले ,निलम उगले आदींसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य बाळासाहेब पारखे म्हणाले, आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार, विहार आणि निद्रा ही आरोग्याची त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. आरोग्याबाबत जनजागृती करून मानवतावादी दृष्टिकोनातून समाजासाठी काम करण्याचा संदेश रोटरी क्लब देत आहे. रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये यापुढेही माझा सक्रिय सहभाग राहील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सादेख पठाण व सूत्रसंचालन प्रफुल सोळंकी यांनी केले तर आभारप्रदर्शन बाळासाहेब पेचे यांनी मानले. रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दलही उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसह शिलादीप हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES







प्रतिनिधी यासीन शेख 9423391215