आपसात विश्वासघात वडील आजारी ;जमीन विकण्याचा बहाना श्रीरामपूर हून जामखेडला बोलावले ; ३ लाख ६४ हजाराला लूटले महिलेसह चारजणांवर गुन्हा दाखल
आपसात विश्वासघात
वडील अजारी आहेत, पैशाची गरज आहे त्यामुळे आम्हाला शेती विकायची आहे. या बहाण्याने श्रीरामपूर येथील दोघांना नान्नज परिसरातील बऱ्हाणपूर जवळील शेतात बोलवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करित सोन्या चांदीचे दागिने , रोख रक्कम व मोबाइल असा एकुण 3 लाख 64 हजार रुपयांना चार जणांच्या टोळक्याने लुटले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एका महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि १९ ऑगस्ट २०२६ रोजी कलिम बिनसाद यांच्या सिक्युरिटी फोर्समधील पार्टनर ज्ञानेश्वर महादेव घायतडक (रा. घायतडकवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना आरोपी हिना शबीर शिंदे हिचा फोन आला. तिचे वडील आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी जमीन विकायची असल्याचे तिने सांगितले. जमीन पाहून घेण्याचे तसेच जमीन पसंत पडल्यास कमी-जास्त करून देण्याचे सांगत, येताना जमिनीसाठी इसार म्हणून काही रक्कम घेऊन येण्यास फीर्यादीस तिने सांगितले. त्यानंतर २३ ऑगस्ट २०२६ रोजी हिना शबीर शिंदे हिने पुन्हा ज्ञानेश्वर घायतडक यांना फोन करून जामखेड येथे जमीन पाहण्यासाठी बोलावले.
त्यानुसार कलिम बिनसाद व त्यांचे मित्र ज्ञानेश्वर घायतडक हे त्यांच्या चारचाकी आय-२० कार क्रमांक एमएच २४ ए. एफ २५२० मधून जामखेड येथे आले. जामखेड येथे आल्यानंतर हिना शिंदे हिला फोन केला असता तिने तिच्या मोबाईलवरून खर्डा रोड, जामखेड येथील लोकेशन पाठवून तेथे बोलावून घेतले. तेथे हिना शिंदे हिची त्यांच्याशी भेट झाली. त्यावेळी तिच्यासोबत एक पुरुष व्यक्ती होती. या व्यक्तीने फीर्यादी व साथीदार यांना त्यांच्या मोटारसायकलच्या मागे येण्यास सांगितले. त्यानंतर कलिम बिनसाद व ज्ञानेश्वर घायतडक हे त्या व्यक्तीच्या मोटारसायकलच्या मागे नान्नज व चोभेवाडीमार्गे बऱ्हाणपूरच्या पुढील रस्त्याने गेले. दुपारी सुमारे १२ वाजता बऱ्हाणपूर परिसरात हिना शिंदे हिने आंब्याचे शेत दाखवले. त्यानंतर त्यांनी आपली चारचाकी गाडी उभी करून शेतात प्रवेश केला. तेथे कलिम बिनसाद व ज्ञानेश्वर घायतडक हे दोघे उभे असताना हिना शिंदे हिच्यासह तिच्या सोबत असलेल्या अन्य तीन व्यक्तीं त्यांना पकडले. यानंतर या चारही जणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कलिम बिनसाद यांच्या जवळ असलेली ३ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच त्यांच्या अंगावरील चांदीच्या दोन अंगठ्या, एक घड्याळ आणि मोबाईल काढून घेतला.
RELATED ARTICLES





या घटनेबाबत कलिम बिनसाद यांनी दि २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित महीला व तीचे तीन साथीदार अशा एकुण चार जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे हे करित आहेत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215