Homeव्हिडिओ बातम्याआपण जगवे कसे वागावे कसे हे "छावा" चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते: उपनगराध्यक्ष...

आपण जगवे कसे वागावे कसे हे “छावा” चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते: उपनगराध्यक्ष महेश निमोणकर. समाजसेवक निलेश गायवळ महेश निमोणकर यांच्या वतीने महीला दिनानिमित्त “छावा” चित्रपट तीन दिवस महिलांना मोफत दाखवण्याचा उपक्रम

 

आपण जगवे कसे वागावे कसे हे “छावा” चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते: उपनगराध्यक्ष महेश निमोणकर.

समाजसेवक निलेश गायवळ महेश निमोणकर यांच्या वतीने महीला दिनानिमित्त “छावा” चित्रपट तीन दिवस महिलांना मोफत दाखवण्याचा उपक्रम

जामखेड प्रतिनिधी

जागतिक महीला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी दि ८ ते १० मार्चपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांच्या धगधगत्या जीवनावर आधारित छावा चित्रपट जामखेड येथील गोरोबा सिनेमा चित्रपटगृहात सर्व महीलांना मोफत दाखवण्याचा उपक्रम समाजसेवक निलेशभाऊ गायवळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी हाती घेतला.जागतीक महिला दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर महिलांनी उपस्थिती राहिली.

जामखेड येथील गोरोबा सिनेमा चित्रपटगृहात जागतीक महिला दिनानिमित्त शनिवार दि. ८ मार्च रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या जिवनावरील आधारीत “छावा” चित्रपट सलग तीन दिवस दोन शो दाखवण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी घेतला होता.
त्यानुसार गोरोबा चित्रपट गृहात छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेला सुवर्णा निमोणकर, अर्चना राळेभात, नगरसेविका राजश्रीताई पवार, सिंधुताई मोहोळकर, सुरेखा निमोणकर, जया जाधव, सोनाली निमोणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, भाजपा नेते प्रा.मधुकर राळेभात, कुंभविश्वदर्शन मासीक (अमरावती) चे संपादक दिलीप खांडेकर, नगरसेवक अमित चिंतामणी, राजेश वाव्हळ मोहन पवार, अमित जाधव, संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार, गोरोबा चित्रपटगृहाचे संचालक विनायक राऊत, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, गणेश डोंगरे, दादासाहेब निमोणकर, भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेभात, बापूसाहेब शिंदे, लक्ष्मण ढेपे संतोष मोहळकर, गणेश काळे, सनी सदाफुले , देविदास भादलकर मनोज भोरे दिपक टेकाळे विकास राऊत आतुल जगताप दिगांबर म्हेत्रे राजु भुजबळ आदी उपस्थित होते.

यावेळी अर्चना राळेभात म्हणाल्या छत्रपती संभाजीराजे यांनी अल्पकालावधीत केलेले पराक्रम व त्यांचा इतिहास भावी पिढीला भावणारा आहे. महिला चुल आणि मूल या जोखडातून बाहेर येणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना पाहता महापुरुषांचा आदर व त्यांचे विचार समाजात पोहचवण्यासाठी “छावा* चित्रपट पाहणे गरजेचे आहे.यावेळी सुवर्णा निमोणकर यांनी महीला दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी छावा चित्रपट सलग तीन दिवस दोन शो दाखवण्याचा उपक्रम राबवून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमाचा लाभ महिलांनी घेण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, महेश निमोणकर, अमित चिंतामणी, विनायक राऊत, संतोष मोहळकर यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे दाखले देत इतिहासातील अनेक गोष्टी  मार्गदर्शनपर सांगितल्या.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!