Homeव्हिडिओ बातम्या"आज याला जिवंत सोडायचे नाही, याचा काटाच काढू" म्हणत कोयत्याने मारहाण ...

“आज याला जिवंत सोडायचे नाही, याचा काटाच काढू” म्हणत कोयत्याने मारहाण नान्नजला यात्रेत डीजे बंद केल्याच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला; एकजण गंभीर जखमी यात्रेला गालबोट

आज याला जिवंत सोडायचे नाही, याचा काटाच काढू”
म्हणत कोयत्याने मारहाण

नान्नजला यात्रेत डीजे बंद केल्याच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला; एकजण गंभीर जखमी
यात्रेला गालबोट

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे यात्रोत्सवादरम्यान डीजे बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून फिर्यादी ईस्माइल ऊर्फ बाबा शेख यांच्या वर कोयता, लोखंडी रॉड, काठ्या, दगड व विटांनी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे .हि घटना रविवारी (दि. २७ जुलै) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात इस्माईल (उर्फ बाबा) मेहमुद शेख (वय ३७, रा. पेठ गल्ली, नान्नज, ता. जामखेड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फिर्यादी इस्माईल (उर्फ पै. बाबा) शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नान्नज येथे रथ यात्रा सुरू असून गावात विविध ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नान्नज बाजारतळ येथेही टपरी धारक व गावकऱ्यांच्या सहकार्याने नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नान्नज येथीलच महेंद्र साळवे यांचा डीजे लावण्यात आला होता.
रात्री सुमारे १०.१५ वाजता पोलिसांनी नियमानुसार कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर डीजे बंद करण्यात आला. पोलिस इतर कार्यक्रम बंद करण्यासाठी निघून गेल्यानंतर फीर्यादी इस्माईल शेख हे डीजे चालकाला तेथून निघण्यास सांगत होते. त्याचवेळी त्यांच्या ओळखीचे लक्ष्मण उर्फ पिऱ्या बबन काळे (रा. आरोळेवस्ती, जामखेड), अनुराग उर्फ सोनु उमेश डाडर व त्यांच्यासोबत आलेले तीन ते चार अनोळखी इसम तेथे आले.

त्यांनी “डीजे पुन्हा सुरू करा” अशी मागणी करत अरेरावी सुरू केली. यानंतर इस्माईल शेख यांनी पोलिसांनीच डीजे बंद केल्याचे सांगितल्यानंतर आरोपी संतप्त झाले. त्यांनी फीर्यादी इस्माईल शेख यांना शिवीगाळ करत दगड, विटा, कोयता, काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इस्माईल शेख व त्यांचा भाचा आझम इम्रान पठाण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान लक्ष्मण उर्फ पिऱ्या बबन काळे याने शर्टाच्या आत लपवून ठेवलेला कोयता काढून “आज याला जिवंत सोडायचे नाही, याचा काटाच काढू” अशी धमकी देत इस्माईल शेख यांच्या डोक्यावर, तोंडावर व पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. तसेच दुसरा आरोपी अनुराग उर्फ सोनु उमेश डाडर याने लोखंडी रॉडने मारहाण केली, तर इतर अनोळखी साथीदारांनी काठ्या व दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली. घटनेनंतर नान्नज बसस्थानक परिसरातील सर्व दुकानदारांनी आपआपले दुकानाचे सेटर खाली घेतले परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा होताच सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या इस्माईल शेख यांना त्यांचा भाचा आझम पठाण व ग्रामस्थांनी तातडीने उचलून जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्यानंतर नान्नज येथील शिवाजी चौकात सुरू असलेल्या शरद उर्फ दादा राजे भोसले यांच्या सांस्कृतिक नर्तिकाचा नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन डीजेच्या गाडीच्या काचा दगडांनी फोडल्या तसेच गाडीवर कोयत्याने वार करून नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी इस्माईल मेहमुद शेख यांनी लक्ष्मण उर्फ पिऱ्या बबन काळे, अनुराग उर्फ सोनु उमेश डाडर आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद दिली असून, संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर, व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे हे करित आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!