Homeव्हिडिओ बातम्याअबब दीड लाखांच्या शेळ्या चोरीला : मित्रांनी एकत्र येऊन व्यवसाय चालू केला....

अबब दीड लाखांच्या शेळ्या चोरीला : मित्रांनी एकत्र येऊन व्यवसाय चालू केला. महिनाभरात परत बेरोजगार :

अबब दीड लाखांच्या शेळ्या चोरीला !
मित्रांनी एकत्र येऊन व्यवसाय चालू केला

महिनाभरात बेरोजगार परत बेरोजगार?

जामखेड प्रतिनिधी
बेरोजगारांनी एकत्र येऊन रोजगार उपलब्ध करण्यासाठी शेळी पालन व्यवसाय सुरू केला. मात्र चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या तब्बल दिड लाख रुपये किमतीच्या शेळ्याच चोरून नेल्या.
पाटोदा तालुक्यातील बीड – जामखेड  महामार्गावर वाजराफाटा व येवले वाडी दरम्यान असलेल्या राहुल हॉटेल (बंद) येथून अज्ञान इसमांनी मध्यरात्री सात शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर असे की महिना भरापुर्वी राम पवार, आमिर शेख आणि शंकर कोल्हे या मित्रांनी मिळून जवळपास चार लाख रुपये गुंतवणूक करून शेळी पालन व्यवसाय सुरू केला राम पवार यांच्या मालकीचं असलेलं जुने बंद असलेले राहुल हॉटेल येथे बंदिस्त शेळीपालन सुरू केलं. चार
लाख रुपयांचे जवळपास अठरा शेळ्या आणि पंधरा पिल्ले आणले होते. महिनाभरापूर्वी शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी त्यातील सात शेळ्या लोखंडी जाळी तोडून लंपास केल्या त्या वेळी त्या ठिकाणी राम पवार आणि राखणदार असलेला अजून एक जण झोपलेले होते. त्यांच्या झोपीचा फायदा घेत चोरट्यांनी सात शेळ्या (अंदाजे दीड लाख रुपये किमतीच्या) चोरून नेल्या ही घटना सकाळी सात वाजता लक्षात आली. याबाबत माहिती
होताच राम पवार यांनी आमिर शेख यांना फोन करून घटनेची माहिती दिली सदर घटना पाटोदा पोलिस मिसाळ यांना कळविली. त्यांनी तातडीने पोलिस नाईक पवळ व घोडके यांना पाठवुन सदर घटनास्थळाचा पंचनामा केला. राम पवार यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसात १०/२०२६ भादवी ३०३(२) नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस मिसाळ करत आहेत.सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पोलीसांनी अशा चोरांचा लवकर छडा लावून कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!